---Advertisement---

अजबच! फलंदाजाने इतका जोरात षटकार खेचला की स्वत:च्याच कारची फोडली काच, व्हिडिओ होतोय व्हायरल

On: मंगळवार, जून 22, 2021 1:46 AM
---Advertisement---

क्रिकेटमध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत, जेव्हा एखाद्या फलंदाजाने षटकार मारला आहे आणि तो चेंडू स्टेडियमबाहेर गेला आहे. अशीच एक घटना इंग्लंडमधील यॉर्कशायरमध्ये खेळत असलेल्या एका स्थानिक क्लबच्या सामन्यादरम्यान घडली. परंतु, फलंदाजाने चेंडू केवळ स्टेडियमबाहेरच न मारता चक्क स्वत:च्याच कारवर मारला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

इलिंगवर्थ सेंट मेरी क्रिकेट क्लब आणि सॉवरबी सेंट पीटर्स क्लब यांच्यात सामना सुरू होता. इलिंगवर्थ सेंट मेरी संघाचा खेळाडू आसिफ अली फलंदाजी करत होता. त्याने फाइन लेगच्या दिशेने एक उत्कृष्ट शॉट मारला. चेंडू मैदानाबाहेर गेला आणि सरळ जाऊन आसिफ अलीच्या कारला लागला. या खेळीनंतर जेव्हा त्याने पाहिले की, चेंडूने त्याच्या स्वत:च्याच कारच्या मागची काच पूर्णपणे फुटली होती, तेव्हा तो आश्चर्यचकीत झाला.

हे सर्व पाहून विरुद्ध संघातील खेळाडू, आसिफ अली सोबतचे खेळाडू आणि पंच या सर्वांनाच आपले हसू आवरले नाही. परंतु, आसिफ अली डोक्याला हात लावून मैदानावरच उभा राहिला. थोड्याच वेळात तो या धक्क्याने तो गुडघ्यावर खाली बसला. या घटनेचा व्हिडीओ इलिंगवर्थ सेंट मेरी क्रिकेट क्लबनी सोशल मीडियावर शेअर केला. कारच्या तुटलेल्या काचेचा ही फोटो पोस्ट केला आहे.

आसिफ अलीने या सामन्यात 43 धावा केल्या आहेत. परंतु, त्याच्या संघाला 7 विकेटने पराभव पत्करावा लागला. अशीच एक घटना ऑगस्ट 2020 मध्ये आयर्लंडचा अष्टपैलू खेळाडू केविन ओ ब्रायन सोबत घडली होती. डबलीनमध्ये पेम्ब्रोक क्रिकेट क्लबच्या जवळ एका पार्किंगमधील कारची मागची काच त्याच्याच खेळलेल्या शॉटमुळे फुटली होती.

महत्त्वाच्या बातम्या –

लयभारी! सनराइजर्स हैदराबादच्या या युवा खेळाडूचा आवज आहे खूपच सुरेल, व्हिडिओ पाहून तुम्हीही कराल कौतुक

धोनी दिसला हिमाचल प्रदेशमधील पारंपारिक टोपीमध्ये; नव्या लूकसह चाहत्यांना खूश करतानाचा व्हिडिओही व्हायरल

केवळ अफलातून! जबरदस्त क्षेत्ररक्षणाने जिंकली न्यूझीलंडच्या खेळाडूंनी मने, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---