भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका शुक्रवारी (22 सप्टेंबर) सुरू झाली. पहिला सामना मोहालीच्या आयएस बिंद्र स्टेडियमवर खेळला गेला. भारतासाठी सलामीवीर शुबमन गिल व ऋतुराज गायकवाड यांनी शानदार सलामी दिल्यानंतर भारताचा डाव अचानक गडगडला. अवघ्या नऊ धावांमध्ये भारताने आपले तीन फलंदाज गमावले.
विजयासाठी मिळालेल्या 277 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला ऋतुराज गायकवाड व शुबमन गिल यांनी 142 धावांची सलामी दिली. त्यानंतर मात्र ऑस्ट्रेलियाने छोटेसे पुनरागमन केले. ऍडम झम्पा याला स्वीप मारण्याच्या प्रयत्नात ऋतुराज अर्धशतकानंतर 71 धावा करून बाद झाला. तर, संघात पुनरागमन करत असलेला श्रेयस अय्यर दुर्दैवी ठरला. तो केवळ तीन धावांवर धावबाद झाला. तर, आपल्या शतकाकडे वाटचाल करत असलेला गिल 74 धावांवर त्रिफळाचित झाला. त्याला झम्पाने बाद केले. त्यामुळे भारताची बिनबाद 142 पासून तीन बाद 151 अशी छोटीशी घसरगुंडी झाली.
(Adam Zampa Took Ruturaj And Gill Wickets Australia Comeback)
महत्वाच्या बातम्या –
U19 विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर! ‘या’ देशात भरणार भविष्यातील सिताऱ्यांचा मेळा
भेदक गोलंदाजीपुढे काँगारूंनी टेकले गुडघे! भारतासाठी मोहम्मद शमी एकटाच चमकला