शेवटच्या सामन्यात न खेळलेला फ्रान्सचा डिफेंडर अदिल रॅमी याचा फिफा विश्वचषक जिंकण्यात मोठा हात आहे. याचे मुख्य कारण आहे त्याची मिशी.
फ्रान्सचे खेळाडू आणि स्टाफ हे सामना सुरू होण्यापूर्वी रॅमीच्या मिशांना हात लावत कारण त्यांच्यासाठी त्या लकी ठरल्या.
फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात फ्रान्सने क्रोएशियाला 4-2 असे पराभूत केले. मात्र या सामन्यात रॅमी खेळला नाही तरी त्याच्या मिशांनी संघाला विजेतेपद मिळवून दिले असे गमतीने म्हणता येईल.
“सामना सुरू होण्याआधी एंटोनी ग्रिझमन आणि मॅनेजर या दोघांनी माझ्या मिशांना हात लावला होता”,असे रॅमी म्हणाला.
“यामुळे माझी मिशी फ्रान्समध्ये खूप लोकप्रिय झाली आहे. मी ही तशीच ठेवणार आहे. याचे महत्त्व तेव्हा कळाले जेव्हा ग्रिझमन याने साखळी फेरीत सामन्यापूर्वी असे केले होते. यानंतर संपूर्ण संघानेच त्याच्या सारखेच केले”, असेही त्यांने पुढे म्हटले.
फ्रान्ससोबत असे याआधीही झाले आहे. 1998च्या विश्वचषकात डिफेंडर लॉरेंट ब्लॅंक हा स्पर्धा होण्यापूर्वी गोलकिपर फेबियन बरटेझ याच्या ट्क्कलला किस करत असे.
तसेच फ्रान्सच्या खेळाडूंचा या गोष्टीवर विश्वास आहे. म्हणून त्यांनी यावर्षीही ती प्रथा सुरू ठेवली.
याचबरोबर 35 वर्षीय रॅमीने फिफा विश्वचषक 2018 स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने एकूण 35 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
–एशियन गेम्स २०१८मध्ये भारतीय फुटबॉल संघ खेळणार?
–एमबाप्पेने फिफा विश्वचषकात मिळालेल्या बक्षिसाची सर्व रक्कम केली दान