मुंबई । काल(१ ऑगस्ट) आयर्लंडविरुद्धच्या दुसर्या वनडे सामन्यात इंग्लंडने दणदणीत विजय मिळवला. या विजयासह इंग्लंडने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. साऊथॅम्प्टनच्या एजेस बाऊल स्टेडियमवर खेळलेल्या या सामन्यात आदिल रशीदने खास विक्रम केला.
आता वनडे क्रिकेटमध्ये 150 विकेट्स घेणारा इंग्लंडचा आदिल रशीद पहिला फिरकीपटू ठरला आहे. त्याच्याआधी इंग्लंडच्या चार वेगवान गोलंदाजांनी वनडेत दीडशे किंवा त्याहून अधिक बळी घेतले असले, तरी हा पराक्रम इंग्लंडच्या कोणत्याही फिरकी गोलंदाजाने केला नव्हता.
इंग्लंडकडून सर्वाधिक वनडे विकेट्सचा विक्रम जेम्स अँडरसनच्या नावावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर डॅरेन गॉफ तर त्यानंतर तिसर्या क्रमांकावर स्टुअर्ट ब्रॉड आणि अँड्र्यू फ्लिंटॉफ चौथ्या क्रमांकावर आहे.
या सामन्यात रशीदने 10 षटकांत 34 धावा देऊन 3 बळी घेतले.
इंग्लंडकडून वनडेत सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज –
269 – जेम्स अँडरसन
234 – डॅरेन गॉफ
178 – स्टुअर्ट ब्रॉड
168 – अँड्र्यू फ्लिंटॉफ
150 – आदिल रशीद
महत्त्वाच्या बातम्या –
माजी निवडकर्ता म्हणतोय, ‘धोनी पुर्वीसारखा फिट नाही, त्याने युवा खेळाडूंसाठी जागा रिकामी करावी’
राहुल द्रविडच्या एका सल्ल्यामुळे या इंग्लंडच्या माजी कर्णधाराचे बदलले होते आयुष्य
आयपीएल गवर्निंग काउंसिलची आज बैठक, घेतले जातील ‘हे’ महत्त्वाचे निर्णय
ट्रेंडिंग लेख –
३ असे भारतीय खेळाडू जे आयपीएलमध्ये खेळले हे अनेकांना माहितीही नसेल…
४ असे प्रसंग जेव्हा बांगलादेशी खेळाडू त्यांच्या कृत्यामुळे ठरले हास्यास पात्र…..
वाढदिवस विशेष : आपले रक्त देऊन भारतीय कर्णधाराचा जीव वाचवणारा वेस्ट इंडिजचा दिलदार दिग्गज