टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2022च्या स्पर्धेत बुधवारी (26 ऑक्टोबर) इंग्लंड विरुद्ध आयर्लंड यांच्यात सुपर 12चा विसावा सामना खेळला गेला. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (एमसीजी) खेळल्या गेलेल्या या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत आयर्लंडला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. आयर्लंडने कर्णधार अँड्र्यू बालबर्नी याच्या अर्धशतकाच्या जोरावर 19.2 षटकांत सर्व विकेट्स गमावत 157 धावसंख्या उभारली. त्यांची धावसंख्या आणखी मोठी झाली असती जर त्यांचा विकेटकीपर-फलंदाज विचित्र पद्धतीने बाद नसता झाला तर.
अँड्र्यू बालबर्नी (Andrew Balbirnie) याने कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. त्याने 47 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकाराच्या साहाय्याने 62 धावा केल्या. यावेळी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला विकेटकीपर-फलंदाज लॉर्कन टकर (Lorcan Tucker) 27 चेंडूत 34 धावाच करू शकला, मात्र त्याने ज्या पद्धतीने आपली विकेट गमावली त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालतोय.
टकर 34 धावा करत खेळपट्टीवर तग धरून होता. विरोधी संघाकडून अनुभवी फिरकीपटू आदिल रशिद 12वे षटक टाकण्यास आला. त्याच्या गोलंदाजीतील शेवटचा चेंडू बालबर्नीने गोलंदाजाच्या दिशेने खेळला. तो चेंडू थांबवण्यात प्रयत्न रशिदने केला मात्र थांबवू शकला नाही आणि चेंडू त्याच्या हाताला लागून स्टम्पला लागला. तेव्हा टकर नेमका क्रिझच्या बाहेर होता. त्यामुळे त्याला बाद होऊन परतावे लागले.
या सामन्यात रशिदने 4 षटकात 24 धावा दिल्या. त्याला यावेळी एकही विकेट मिळाली नाही, मात्र त्याने ज्याप्रकारे टकरला बाद केले ते उल्लेखनीय होते. कारण तो बाद नसता झाला तर आयर्लंडच्या धावसंख्येत अजून भर पडली असती. असे असले तरी स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी आणि पहिल्यांदाच एमसीजीवर खेळणाऱ्या आयर्लंडने इंग्लंडला चांगलाच त्रास दिला. पहिल्या फेरीतून सुपर 12साठी पात्र ठरलेल्या आयर्लंडला या स्पर्धेतील पहिल्या सुपर 12च्या सामन्यात श्रीलंकेकडून 9 विकेट्सने पराभूत व्हावे लागले होते. यामुळे त्यांच्यासाठी हा सामना जिंकणे महत्वाचे.
https://www.instagram.com/reel/CkKmpPvL3qy/?utm_source=ig_web_copy_link
इंग्लंडकडून मार्क वूड आणि लियाम लिविंगस्टोन यांनी उत्तम कामगिरी केली. दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. लियामने तर 3 षटकात 17 धावाच दिल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फलंदाजीला येण्याआधी कार्तिकला कोसले मग…! शेवटच्या चेंडूची कहानी अश्विनकी जुबानी
जिंकल्यानंतरही ऑस्ट्रेलियाचा नकोसा विक्रम, टी20 क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘असे’ घडले कांगारूंसोबत