भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून उभय संघात १ कसोटी सामना, ३ सामन्यांची वनडे आणि टी२० मालिका खेळली जाणार आहे. या मालिकांपूर्वी पाहुण्या भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी पुढे आली आहे. इंग्लंडचा अनुभवी फिरकीपटू आदिल राशिद हा भारताविरुद्धच्या टी२० आणि वनडे मालिकेला मुकण्याची शक्यता आहे. ७ ते १७ जुलैदरम्यान भारत आणि इंग्लंड संघात मर्यादित षटकांच्या मालिका होणार आहेत. यादरम्यान राशिद हज यात्रेवर जाणार आहे. याच कारणास्तव तो मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी इंग्लंडच्या संघाचा भाग नसणार आहे.
राशिद इंग्लंडच्या वनडे आणि टी२० संघाचा प्रमुख फिरकीपटू आहे. त्याच्या गोलंदाजीपुढे विराट कोहली, रोहित शर्मासारखे फलंदाज गुडघे टेकताना दिसतात. अशात राशिदच्या अनुपस्थितीत इंग्लंडचा फिरकी विभाग दुबळा पडेल. त्याच्या जागी जॅक लिचला संघात जागा दिली जाऊ शकतो. जॅक लिच भारताविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडच्या संघाचा भाग आहे. जॅक लिचव्यतिरिक्त मोईन अली आणि लियाम लिविंगस्टोन या फिरकीपटूंचे पर्यायची इंग्लंडपुढे असतील.
भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंनाही विश्रांतीची शक्यता
दुसरीकडे विराट कोहली, कर्णधार रोहित शर्मा, रिषभ पंत आणि जसप्रीत बुमराह या दिग्गजांना इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत विश्रांती दिली जाऊ शकते. माध्यामांतील वृत्तानुसार आयर्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी जो युवा भारतीय संघ निवडला गेला आहे, तोच युवा खेळाडूंचा संघ इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेत मैदानात उतरवला जाऊ शकतो. म्हणजेच आयर्लंडविरुद्ध भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या हार्दिक पंड्याला इंग्लंडसारख्या बलाढ्य संघाविरोधातही कर्णधार बनण्याची संधी मिळू शकते.
असे आहे मर्यादित षटकांचे वेळापत्रक
भारत विरुद्ध इंग्लंड संघातील टी२० मालिका ७ जुलैपासून सुरू होणार आहे. पहिला टी२० सामना साउथम्पटन येथे खेळला जाणार आहे. त्यानंतर ९ जून रोजी बर्मिंघम येथे दुसरा टी२० सामना होईल व १० जूनला नॉटिंघममधील तिसऱ्या टी२० सामन्यासह ही मालिका संपेल. त्यानंतर लगेचच वनडे मालिकेला सुरुवात होईल. १२ जून रोजी लंडन येथे पहिला वनडे सामना खेळला जाईल. पुढे १४ जून रोजी लंडन येथे दुसरा व १७ जून रोजी मँचेस्टर येथे तिसरा वनडे सामना होईल. या सामन्यासह भारताच्या इंग्लंड दौऱ्याचीही अखेर होईल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
एनस्विंग बॉलवर शार्दूलने आपली विकेट केली बहाल, पाहा व्हिडिओ
ओडिशा सरकारने अल्टीमेट खो खो व्यावसायिक लीगमध्ये घेतली पाचव्या संघाची मालकी
आयसीसीच्या एलिट पॅनलचा भाग राहिलेल्या पंचावर ओढावलीय चपला विकण्याची वेळ, पण का?