कसोटी क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठित कसोटी मालिका असलेली ऍशेस मालिका सध्या ऑस्ट्रेलियात खेळली जात आहे. सिडनी येथे खेळला गेलेला मालिकेतील चौथा सामना क्रिकेटप्रेमींच्या काळजाचा ठोका चुकवणारा ठरला. एक वेळ ऑस्ट्रेलिया आरामात हा सामना जिंकेल असे वाटत असताना, इंग्लंडच्या अखेरच्या तीन फलंदाजांनी कमालीचे धैर्य दाखवत सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवले. जगभरातील अनेक क्रिकेटप्रेमींनी हा सामना पाहिला. ज्यामध्ये महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेल्या आदित्य ठाकरे यांचादेखील समावेश होता.
इंग्लंडने अनिर्णीत राखला सामना
मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांप्रमाणे चौथा सामनाही ऑस्ट्रेलिया सहज खिशात घालण्याच्या जवळ आला होता. मात्र, इंग्लंडचे अखेरचे तीन फलंदाज स्टुअर्ट ब्रॉड, जॅक लिच व जेम्स अँडरसन यांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा धैर्याने सामना करत हा सामना अनिर्णित राखला. या तिघांच्या कामगिरीचे सर्व क्रिकेटप्रेमी कौतुक करत आहेत.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने हे अखेरचे दोन बळी मिळवण्यासाठी सर्व ११ क्षेत्ररक्षक फलंदाजांच्या आजूबाजूला उभे केले होते. असे चित्र क्रिकेटच्या मैदानावर क्वचितच दिसत असते. त्याचबरोबर गोलंदाज अत्यंत त्वेषाने मारा करत असताना, फलंदाजांनी कमालीचा संयम दाखवला.
आदित्य ठाकरे यांनी केले ट्विट
महाराष्ट्र सरकारमध्ये सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री असलेले पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे देखील या सामन्याचा आनंद घेत होते. त्यांनी सामन्यानंतर ट्विट करत लिहिले,
‘याच कारणाने आपण कसोटी क्रिकेटला मानले पाहिजे. ऍशेसमधील आजची शेवटची १० षटके. क्षेत्ररक्षकांची रचना, कौशल्य आणि दोन्ही संघातील खेळाडूंची जिद्द’
This is why we must celebrate Test Cricket- the last 10 overs of the #Ashes today… the field placement, skill and the intensity from both sides of the game.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) January 9, 2022
आदित्य ठाकरे हे मोठे क्रिकेटप्रेमी मानले जातात. त्यांना अनेकदा क्रिकेट खेळताना पाहिले गेले आहे. ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घडणाऱ्या अनेक सामन्यांविषयी ट्विटरवर व्यक्त होत असतात.
महत्त्वाच्या बातम्या-