भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनच्या वैयक्तिक आयुष्याबाबत नुकतीच एक मोठी बातमी समोर येत आहे. शिखर आणि त्याची पत्नी आयेशा मुखर्जी यांचा घटस्पोट झाला आहे. याबद्दल आयेशाने इंस्टाग्रामवर भावूक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.
शिखर आणि आयेशा यांचे २०१२ साली लग्न झाले होते. तसेच त्यांना जोरावर नावाचा मुलगा देखील आहे. मात्र लग्नाच्या ९ वर्षांनंतर त्यांनी घटस्पोट घेतला आहे. आयेशाचे शिखर बरोबरच दुसरे लग्न होते. यापूर्वीही तिचा एकदा घटस्पोट झाला आहे. तिला शिखरबरोबर लग्न करण्यावेळी दोन मुलीही होत्या. या दोन मुलींचाही शिखरने स्विकार केला होता.
आयेशा गेल्या अनेक वर्षांपासून ऑस्ट्रेलियामध्ये राहाते, त्यामुळे शिखर वेळ मिळेल तेव्हा ऑस्ट्रेलियाला जायचा किंवा आयेशा भारतात यायची.
आयेशाने शिखरपासून वेगळे झाल्याची माहिती देताना पोस्ट केली आहे की तिला घटस्पोट हा घाणेरडा शब्द वाटत होता, मात्र, तिच्या आयुष्यात तिला दुसऱ्यांदा याचा अनुभव घ्यावा लागला. दुसऱ्यांदा घेतलेला अनुभव पहिल्या अनुभवाप्रमाणेच भितीदायक होता. तिला ती चूकत असल्यासारखे वाटत होते. पण जेव्हा सर्व भावनांचा आणि गोष्टींचा विचार केला तेव्हा तिला जाणवले की तिने घटस्पोटाकडे पाहाण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा. ज्या प्रकारे मला त्याकडे पहायचे होते आणि ते अनुभवायचे होते.
https://www.instagram.com/p/CTeBuiopxES/
नातं तुटल्याची होती चर्चा
शिखर आणि आयेशा यांच्यात दुरावा आल्याची चर्चा गेल्या वर्षीपासून सुरु होती. कारण, दोघांनीही एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केलं होतं. तसेच त्यांनी एकमेकांबरोबरील पोस्ट टाकणंही बंद केलं होतं. इतकंच नाही, तर आयेशाने इंस्टाग्रामवर तिचे दुसरे अकाउंटही चालू केले होते.
याबरोबर आयेशाची मोठी मुलगी आलियाने देखील शिखर बरोबरील इंस्टाग्रामवर पोस्ट केलेले फोटो डिलिट केले होते. त्याचबरोबर मर्यादीत षटकांच्या मालिकांसाठी शिखर गेल्यावर्षी जेव्हा ऑस्ट्रेलिया दौऱ्याला गेला होता, त्यावेळीही तो घरी न जाता थेट भारतात परतला होता. विशेष म्हणजे २२ डिसेंबरला त्याच्या मुलाचा जोरावरचा वाढदिवस होता. असे असतानाही तो घरी गेला नसल्याची चर्चा होती. या सर्व घडामोडींमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून त्याचे आणि आयेशा यांचे नाते बिघडल्याची चर्चा होती.
फेसबुकवर झाली होती ओळख
शिखर आणि आयेशा यांची फेसबुकवर ओळख झाली होती. त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी नंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. लग्नानंतर अनेकदा आयेशा भारताच्या सामन्यांसाठी स्टेडियममध्ये हजेरी लावायची. मात्र, आता त्यांचे नाते तुटल्याची बातमी आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
कोहलीच्या नेतृत्वापासून ते रोहितच्या शतकापर्यंत, ‘ही’ आहेत ऐतिहासिक विजयामागील ५ प्रमुख कारणे
‘त्याच्यामुळे सामन्यात फरक पडला’, विराटने रोहितला नव्हे, तर ‘या’ खेळाडूला दिले विजयाचे श्रेय
मँचेस्टर कसोटीत ‘हिटमॅन’ मैदानात उतरणार का? दुखापतीबाबत स्वतः रोहित शर्माने दिली मोठी अपडेट