एएफसी एशियन कपच्या क्वालिफायर्स स्पर्धेसाठी भारतीय संघ पात्र ठरला आहे. या स्पर्धेत मंगळवारी (१४ जून) हाँग काँगला ४-०ने पराभूत करत भारतीय संघाने सलग तिसऱ्या सामन्यात विजय मिळवला आहे. भारताचा कर्णधार सुनिल छेत्री (Sunil Chhetri) याने पुन्हा एकदा त्याचा खेळ उंचावात संघाला विजय मिळवून देण्यात महत्वाची भुमिका पार पाडली आहे. या सामन्यात त्याने एक गोल नोंदवत आंतरराष्ट्रीय फुटबॉलच्या इतिहासामध्ये विक्रम केला आहे.
हाँगकाँग विरुद्धच्या सामन्यात छेत्रीने ४५ मिनिटाला गोल करत त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ८४वा गोल केला आहे. त्याने सर्वकालिन सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंमध्ये संयुक्तपणे पाचवे स्थान पटकावले आहे. त्याने रियल माद्रिद आणि हंगेरीचा दिग्गज फुटबॉलपटू फेरेंक पुस्कासच्या आंतरराष्ट्रीय गोलची बरोबरी केली आहे. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये भारतासाठी ही अभिमानाची बाब आहे.
छेत्रीने ब्राझिलचा दिग्गज पेले याला याआधी मागे पाडले आहेत. त्याने ऑक्टोबर २०२१मध्ये ही कामगिरी केली आहे. आंतरराष्ट्रीय सर्वाधिक गोल करणाऱ्या सक्रिय खेळाडूंमध्ये पोर्तुगलचा ख्रिस्तीयानो रोनाल्डो ११७ गोलसह अव्वल स्थानावर आहे. अर्जेंटीनाचा लियोनल मेस्सी ८६ गोल करत तिसऱ्या स्थानावर आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वकालिन सर्वाधिक गोल करणारे फुटबॉलपटूः
११७ – ख्रिस्तियानो रोनाल्डो
१०९ – अली दाई
८९ – मोख्तर दहारी
८६ – लियोनल मेस्सी
८४ – सुनिल छेत्री
८४ – फेरेन्स पुस्कस
छेत्राच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला नुकतेच १७ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याने २००५मध्ये भारताय वरिष्ठ संघात पदार्पण करत पहिल्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध गोल केला होता. आतापर्यंत त्याने १२९ सामने खेळले आहेत.
आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक गोल करणारे सक्रिय फुटबॉलपटूः
११७ – ख्रिस्तियानो रोनाल्डो
८६ – लियोनल मेस्सी
८४ – सुनिल छेत्री
“विक्रमांकडे मी फारसे लक्ष देत नाही. मला खेळाचा आनंद घ्यायचा असतो आणि संघासाठी उत्तम कामगिरी करण्याचे माझे प्रयत्न असतात,” असे ३७ वर्षीय छेत्रीने सामन्यानंतर म्हटले आहे.
छेत्रीने सुरू असलेल्या एएफसी एशियन कप क्वालिफायर्सच्या तीन सामन्यात चार गोल केले आहे. तर या स्पर्धेत त्याचे एकूण सात गोल झाले आहेत.
कोलकाताच्या सॉल्ट लेक स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताचा सामना सुरू होण्याआधीच या स्पर्धेच्या पुढील फेरीत प्रवेश निश्चित झाला होता. भारताला तब्बल २९ वर्षानंतर हाँगकाँगवर विजय मिळवण्यात यश आले आहे. हाँगकाँगविरुद्ध खेळलेल्या १६ सामन्यांमधील हा ८वा विजय आहे. या विजयामुळे भारत ग्रुप डीच्या गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर आल्याने मुख्य फेरीत प्रवेश केला आहे.
भारत सलग दुसऱ्यांदा एएफसी एशियन कपसाठी पात्र ठरला आहे. २०१९मध्ये साखळी सामन्यातून संघ बाहेर झाला होता. १९६४, १९८४, २०११, २०१९ आणि २०२३ असा पाच वेळा भारत या स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयसीसी महिला वनडे क्रमवारीत भारताच्या ‘या’ त्रिकुटाचे नाणे खणकतयं; वाचा सविस्तर
रणजी ट्रॉफीसाठी खेळाडूंचं सिलेक्शन होतं तरी कसं, काय खटाटोप करावा लागतो? जाणून घ्या एका क्लिकवर
भारताला तडफदार सुरुवात देणाऱ्या ‘ऋतु-इशान’ने रचलाय इतिहास, वाचा काय आहे विक्रम






