अफगाणिस्तान विरुद्ध बांग्लादेश यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली गेली. जे की अफगाणिस्तान संघाने ही मालिका 2-1 ने जिंकली. अफगाणिस्तानने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात चमकदार कामगिरी करत बांग्लादेशचा 8 गडी राखून पराभव केला. या सामन्यात अफगाणिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज रहमानउल्ला गुरबाजने शानदार शतक झळकावले. त्याच्या शतकामुळेच संघाचा विजयाचा मार्ग सोपा झाला. या वर्षातील त्याचे हे तिसरे आंतरराष्ट्रीय शतक ठरले. तसेच हे त्याच्या कारकिर्दीतील 8 वे एकदिवसीय शतक होते. या शतकासह गुरबाजने टीम इंडियाचा महान फलंदाज विराट कोहलीला एका खास विक्रमात मागे टाकले. त्याचबरोबर त्याने सचिन तेंडुलकरचीही बरोबरी केली आहे.
गुरबाजच्या आठव्या एकदिवसीय शतकाने त्याला कोहलीला मागे टाकण्यास मदत केली, परंतु तो महान सचिन तेंडुलकरला मागे टाकू शकला नाही. गुरबाजने आठवे वनडे शतक झळकावण्यासाठी केवळ 46 डाव घेतले. याशिवाय त्याने वयाच्या 22 व्या वर्षी 8 वनडे शतके झळकावली आहेत. फक्त सचिन तेंडुलकर आणि दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकने इतक्या कमी वयात 8 शतके झळकावली होती. या वयात विराट कोहलीच्या नावावर 7 वनडे शतके आहेत. अशा परिस्थितीत तो आता या यादीत विराट कोहलीच्या पुढे गेला आहे. याशिवाय, गुरबाज सर्वात कमी एकदिवसीय डावात 8 शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.
वयाच्या 22 व्या वर्षी सर्वाधिक वनडे शतके
8 – रहमानउल्ला गुरबाज
8 – सचिन तेंडुलकर
8 – क्विंटन डी कॉक
7 – विराट कोहली
6 – बाबर आझम
8 एकदिवसीय शतक गाठण्यासाठी सर्वात कमी डाव:
हाशिम आमला : 43 डाव
बाबर आझम : 44 डाव
रहमानउल्ला गुरबाज : 46 डाव
इमाम उल हक : 47 डाव
क्विंटन डी कॉक : 52 डाव
सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, बांग्लादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. महमुदुल्लाहच्या 98 आणि मेहदी हसन मिराझच्या 66 धावांच्या जोरावर संघाने मर्यादित 50 षटकांत 244 धावा केल्या. हा सामना जिंकण्यासाठी अफगाणिस्तानला 245 धावांचे लक्ष्य देण्यात आले. त्यांनी 48.2 षटकात केवळ 5 गडी गमावून 246 धावा केल्या आणि सामना 5 विकेट्सने जिंकला.
हेही वाचा-
Champions Trophy 2025; पाकिस्तानने नकार दिल्यास या देशात होणार चॅम्पियन्स ट्रॉफी, मोठा खुलासा
BGT 2024-25; शार्दुल ठाकुरच्या जागी नितीश रेड्डीला संधी का? गौतम गंभीरने स्पष्टच सांगितले
IPL 2025; “मला अशा संघात खेळायचे आहे…” आयपीएलपूर्वी केएल राहुलने व्यक्त केली इच्छा