AFG Vs IRE : अफगाणिस्तान आणि आयर्लंड यांच्यात सध्या कसोटी मालिका खेळली जात असून आयर्लंड क्रिकेट संघाने कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. तसेच 2018 मध्ये आयर्लंडला क्रिकेटचा दर्जा मिळाला होता. त्यानंतर सहा वर्षातच कसोटी क्रिकेटमध्ये विजय मिळवला आहे. संयुक्त अरब अमीरातच्या अबुधाबीत खेळलेल्या सामन्यात आयर्लंडने अफगाणिस्तान संघाचा 6 विकेट्सने पराभव केला आहे.
याबरोबरच अफगाणिस्तान संघाच पहिला डाव 155 धावांमध्ये गुंडाळल्यानंतर आयर्लंडने पहिल्या डावात 263 धावा केल्या होत्या. यामध्ये पॉल स्टर्लिंगने 52 धावांची खेळी केली होती. तसेच झिया उर रहमान याने 64 धावा देत पाच फलंदाजाना बाद केले होते. यामुळे अफगाणिस्तानचा संपूर्ण संघ 155 धावांत गारद झाला होता. तसेच क्रेग यंग आणि कर्टिस कॅम्फर यांनाही 2-2 विकेट्स मिळवल्या होत्या. यानंतर दुसऱ्या डावात अफगाणिस्तानचा संघ केवळ 218 धावा करून गडगडला आणि 110 धावांची आघाडी घेत आयर्लंडला 111 धावांचे लक्ष्य मिळाले होते. त्यानंतर अफगाणिस्तान संघाने तिसऱ्याच दिवशी 4 गडी गमावून हे लक्ष्य पूर्ण केले आहे.
— Cricket Ireland (@cricketireland) March 1, 2024
तर या सामन्यात गोलंदाज मार्क ॲडर हा आयर्लंडच्या विजयाचा नायक ठरला असून त्याने दोन्ही डावात 8 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय क्रेग यंगला दोन्ही डावात एकूण 5 विकेट्स मिळाल्या आहेत. तसेच फलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर पॉल स्टर्लिंगने पहिल्या डावात अर्धशतक झळकावले होते. तर दुसऱ्या डावात कर्णधार अँड्र्यू बालबर्नीने 58 धावांची नाबाद खेळी केली आहे. यामुळे आयर्लंडने अफगाणिस्तान संघाचा 6 विकेट्सने पराभव केला आहे.
H.I.S.T.O.R.Y. pic.twitter.com/JYZQxYYfjq
— Cricket Ireland (@cricketireland) March 1, 2024
आत्तापर्यंतचे आयर्लंड संघाचे कसोटी मालिकेतील निकाल पुढीलप्रमाणे –
आयर्लंड विरुद्ध पाकिस्तान, 2018: पाकिस्तान 0-1 ने जिंकला
अफगाणिस्तान वि आयर्लंड, 2018-19: अफगाणिस्तान 1-0 विजयी
इंग्लंड विरुद्ध आयर्लंड, 2019: इंग्लंड 1-0 ने जिंकला
बांगलादेश वि आयर्लंड, 2022-23: बांगलादेश 1-0 विजयी
श्रीलंका विरुद्ध आयर्लंड, 2023: श्रीलंका 2-0 ने जिंकली
इंग्लंड विरुद्ध आयर्लंड, 2023: इंग्लंड 1-0 ने जिंकला
अफगाणिस्तान वि आयर्लंड, 2023/24: आयर्लंड 1-0 विजयी
महत्वाच्या बातम्या –
- IPL 2024 : धोनीच्या खास मित्रानं स्पष्टच सांगितलं, ‘धोनी आणखी दोन आयपीएल सीझन खेळणार…
- WPL 2024 : युपी वॉरियर्सचा गुजरात जायंट्सवर 6 गडी राखून विजय, अन् मुंबई इंडियन्सला धक्का