अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील एकमात्र कसोटी सामना ग्रेटर नोएडा येथील शहीद विजय सिंह पथिक स्टेडियमवर खेळवला जाणार होता. मात्र आज बुधवारी तिसऱ्या दिवशीही पावसामुळे हा सामना सुरू होऊ शकला नाही. पावसामुळे स्टेडियमची अवस्था बिकट झाली आहे. याबाबत ग्रेटर नोएडा स्टेडियमशी संबंधित अधिकाऱ्यांवरही सोशल मीडियावर बरीच टीका झाली. मैदानातील पाणी काढण्यासाठी योग्य व्यवस्था नाही. पाणी सुकविण्यासाठी पंखे लावण्यात आले होते. त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत असून ते मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
वास्तविक, सोमवारपासून अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी सामना खेळवला जाणार होता. मात्र सलग तिसऱ्या दिवशी पावसामुळे हा सामना सुरू होऊ शकला नाही. एवढेच नव्हे तर नाणेफेकही होऊ शकली नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआने) अफगाणिस्तानला ग्रेटर नोएडा व्यतिरिक्त इतर ठिकाणांचा पर्याय दिला होता. पण बोर्डाने त्याला होम ग्राउंड बनवले. ग्रेटर नोएडा स्टेडियममधील व्यवस्था अत्यंत वाईट दिसली. स्टेडियम सुकविण्यासाठी कर्मचाऱ्यांनी विद्युत पंखे लावले होते.
खराब व्यवस्थापनामुळे ग्रेटर नोएडा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे अधिकारी चपराक बसले आहेत. मैदानाच्या दुरवस्थेसोबतच आणखी एक बाब समोर आली होती. मंगळवारी स्टेडियमच्या वॉशरूमचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यामध्ये केटरर वॉशरूममध्ये भांडी धुताना दिसत आहे.
now on the second #Afghanistan_New Zealand #Test…..
What a joke friend….when you had time you didn’t save us from rain, now use fansDue to the negligence of @OfficialGNIDA the game could not start till now on the second day#Greater_Noida #AFGvsNZ #cricket #Test_match pic.twitter.com/aF7MyFTzyy
— Junaid Hanafi جنید حنفی (@JunaidRazwi) September 11, 2024
India’s betrayal of Afghanistan cricket is shocking! Greater Noida Stadium isn’t even fit for street cricket.
Groundsmen patching grass from practice areas, and catering using urinal washroom taps for water! How can they treat a Test team like this? #AFGvNZ #ShameOnIndia https://t.co/qXD8pRDM4W pic.twitter.com/Se3SyENhI9
— Conflict Watch (@ConflictWatchX) September 10, 2024
Groundsmen at the Greater Noida Stadium have been cutting patches of grass from the practice facility and installing them in the outfield of the main ground in afg vs nz match. pic.twitter.com/V7kM6l0Oqx
— cricket addict’s (@cricket0addicts) September 10, 2024
हेही वाचा-
आयपीएल संघांवर सायबर हल्ला, दिल्ली कॅपिटल्सनंतर या फ्रँचायझीचे ‘एक्स’ अकाउंट हॅक!
Diamond League; नीरज चोप्रा पुन्हा ॲक्शनमध्ये, यंदा सुवर्णपदकाचा मार्ग मोकळा..!
स्टीव्ह स्मिथचे मोठे वक्तव्य, म्हणाला- विराट कोहली महान फलंदाज, पण…






