भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा 13 आणि 14 सप्टेंबर रोजी ब्रुसेल्स बेल्जियम येथे होणाऱ्या डायमंड लीग फायनल 2024 मध्ये सहभागी होण्यासाठी सज्ज झाला आहे. नीरजचा सामना 14 तारखेला होणार आहे. जिथे एकूण 6 खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळेल. या स्पर्धेत नीरजची नजर 90 मीटरच्या विक्रमावर आहे, जो तो बऱ्याच दिवसांपासून मोडण्याचा प्रयत्न करत आहे.
मूळचा हरियाणाचा रहिवासी असलेला आणि ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा या मोसमाच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. त्याने लॉसने आणि दोहा डायमंड लीगमध्ये दुसरे स्थान मिळवून चमकदार कामगिरी केली. लॉसनेमध्ये त्याची सर्वोत्तम थ्रो 89.49 मीटर होती, तर दोहामध्ये त्याने 88.36 मीटर फेक केली. मात्र, नीरजचे 90 मीटरचे अंतर पार करण्याचे स्वप्न आहे, ते अद्याप पूर्ण झालेले नाही. स्टॉकहोम डायमंड लीग 2022 मध्ये नीरजने 89.94 मीटर ही त्याची सर्वोत्तम थ्रो केली होती आणि यावेळी त्याच्याकडे 90 मीटरचा आकडा गाठण्याची सुवर्ण संधी आहे.
यावर्षी केवळ एकाच डायमंड लीगमध्ये सहभागी झालेला पाकिस्तानचा अर्शद नदीम अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकलेला नाही. त्यामुळे नीरज आणि अर्शद यांच्यातील बहुप्रतिक्षित सामना या लीगमध्ये होणार नाही.
पुरुष भालाफेक अंतिम ऍथलीट यादी
नीरज चोप्रा (भारत), टिमोथी हर्मन (बेल्जियम), आर्टर फेल्फनर (युक्रेन), गेन्की रॉड्रिक डीन (जपान), जेकब वडलेच (चेचिया), ज्युलियन वेबर (जर्मनी), अँड्रियान मार्डेरे (मोल्दोव्हा), अँडरसन पीटर्स (ग्रेनाडा)
आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता अविनाश साबळे हे देखील या डायमंड लीग फायनल 2024 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. साबळे 3000 मीटर स्टीपलचेस स्पर्धेत सहभागी होणार आहे. अलीकडच्या काळात साबळेच्या कामगिरीत घसरण झाली आहे. पॅरिस 2024 ऑलिम्पिकमध्ये 11 वे आणि पोलंडमधील अलीकडील सिलेसिया डायमंड लीगमध्ये 14 वे स्थान मिळवले आहे. ब्रुसेल्स येथे होणाऱ्या या स्पर्धेत विजय मिळवण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असेल.
पुरुषांची 3000 मीटर स्टीपलचेस अंतिम यादी
अविनाश साबळे (भारत), अब्राहम किबिवोटे (केनिया), अब्राहम सिमे (इथियोपिया), डॅनियल आर्से (स्पेन), अब्देराफिया बौसाले (मोरोक्को), सुफियाने बक्काली (मोरोक्को), सॅम्युअल फीरवो (इथिओपिया), मोहम्मद अमीन झिनौई (ट्युनिशिया), विल्बरफोर्स केमीट कोन्स (केनिया), मोहम्मद टिंडौफ्ट (मोरोक्को), गेटनेट वाले (इथिओपिया
हेही वाचा-
स्टीव्ह स्मिथचे मोठे वक्तव्य, म्हणाला- विराट कोहली महान फलंदाज, पण…
‘बाबर vs विराट’, वसीम अक्रमने क्षणात मिटवला वाद, म्हणाला ‘कोहलीने इतिहासातील…’
ind vs ban; सर्फराज-कुलदीप बाहेर, यश दयालवर प्रश्नचिन्ह; पाहा सलामी कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हन