---Advertisement---

तालिबानी संकटानंतर अफगाणिस्तान टी२० विश्वचषकात खेळणार की नाही? सीईओने केले स्पष्ट

On: शनिवार, ऑगस्ट 21, 2021 1:08 PM
---Advertisement---

अफगानिस्तानवर तालिबानने कब्जा मिळवला आहे. अशात आता अफगानिस्तान क्रिकेट संघाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी हा संघ सहभागी होणार होता. मात्र सध्या निर्माण झालेल्या अफगानिस्तानमधील परिस्थितीमुळे संघ या स्पर्धेत उपस्थित राहणार नाही असा अंदाज बांधला जात आहे. अशात अफगानिस्तानच्या क्रिकेट बोर्डाचे सीईओ हामिद शिनवारी यांनी शुक्रवारी (२० ऑगस्ट) याविषयी माहिती दिली आहे.

शिनवारी म्हणाले, “आम्ही पाकिस्तानसोबतच वनडे मालिका खेळणार आहोत. यानंतर आम्ही टी-२० विश्वचषकासाठीही तयार आहोत.” श्रीलंका क्रिकेट बोर्डाने याच आठवड्याच्या सुरूवातीला सांगितले होते की, ते अजूनही अफगानिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील मालिकेचे आयोजन हंबनटोटाच्या एका मोकळ्या स्टेडियमवर करण्याची आशा करत आहेत.

या दोन संघातील एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिका ४ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. अगोदर हे सामने यूएईमध्ये खेळले जाणार होते. मात्र नंतर ते श्रीलंकेत आयोजित करण्यात आले आहेत. जेथे अफगानिस्तान संघ पाकिस्तानविरुद्ध वनडे सामने खेळणार आहे. यूएईत या मालिकेऐवजी आयपीएलचे आयोजन केले गेले आहे.

शिनवारी यांनी पुढे बोलताना सांगितले की, “बीसीसीआय आणि अन्य क्रिकेट बोर्डांसोबत आमचे वास्तवात चांगले संबंध आहेत. आयसीसीही आमच्या संपर्कात आहे. ते आमच्या हालचालींवर नजर ठेवून आहेत. आत्तापर्यंत क्रिकेटविषयी कोणतीच समस्या आली नाही.”

महिलांच्या टी२० विश्वचषकातील सहभागाबद्दल शिनवारींनी सांगितले की तालिबानपासून क्रिकेटला कोणताच धोका दिसत नाही. त्यांनी सांगितले की, “तालिबानच्या शासनात क्रिकेट आधीही मुद्दा नव्हता आणि आताही कोणता मूद्दा नसणार आहे. तरीही सध्या आम्ही महिला क्रिकेटच्या स्थितीवर टिप्पणी करण्यासाठी असमर्ध आहोत. पण येत्या आठवड्यात स्थिती स्पष्ट होईल.”

तालिबानने याआधी १९९० च्या दशकात अफगानिस्तानच्या खेळाला त्याच्या नियंत्रणाखाली घेतले होते. तेव्हाही तालिबानचे अफगानिस्तानात शासन होते. त्यांच्या पहिल्या शासनकाळात इस्लामीक कट्टरपंथी समूहाने अफगानिस्तान क्रिकेटवर नियंत्रण ठेवले होते. तालिबान असे मानते की, खेळामुळे धार्मीक कर्तव्यापासून लक्ष विचलित होते.

महत्त्वाच्या बातम्या-

जबरा सेलिब्रेशनचे जबरा चाहते! मोहम्मद सिराजच्या विशेष जल्लोषाचे हैदराबादमध्ये भलेमोठे कट-आऊट

‘धोनीने २०११ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील मॅच विनिंग निर्णय माझ्या भितीनेच घेतला,’ श्रीलंकन गोलंदाजाचे भाष्य

हे पोरगं गजब आहे! पंतचे चक्क इंग्लंडकडून यष्टीरक्षण; समालोचक म्हणे, ‘उभ्या आयुष्यात असं पाहिलं नाही’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---