वनडे विश्वचषक स्पर्धेतील 11व्या दिवशी 13 व्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध अफगाणिस्तान संघ आमने-सामने आहेत. हा सामना दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडिअममध्ये खेळला गेला. यापूर्वी उभय संघात नाणेफेक झाली. ही नाणेफेक इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याने जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, त्याचा हा निर्णय अफगाणिस्तानच्या सलामीवीरांनी चुकीचा ठरवला.
स्पर्धेत सलग दोन पराभव स्वीकारल्यानंतर या सामन्यात अफगाणिस्तान संघाला प्रथम फलंदाजी संधी मिळाली. त्यांचे युवा सलामीवीर रहमानुल्लाह गुरबाज व इब्राहिम झादरान यांनी सुरुवातीपासून इंग्लंडच्या अनुभवी गोलंदाजांवर आक्रमण केले. खासकरून गुरबाज हा अत्यंत धडाकेबाज फलंदाजी करत होता. त्याने वेगवान फलंदाजी करत आपले अर्धशतक पूर्ण केले.
अफगाणिस्तान संघाने 12.4 षटकात आपले शतक पूर्ण केले. यामध्ये गुरबाजने 45 चेंडूंमध्ये 66 धावांचे योगदान दिले. इंग्लंड विरुद्ध अफगाणिस्तानने प्रथमच पहिल्या गड्यासाठी शतकी भागीदारी केली.
इंग्लंड संघाला पहिले यश मिळवण्यासाठी 17 व्या षटकापर्यंत वाट पहावी लागली. आदिल रशिदने 114 धावसंख्या असताना इब्राहिम याला बात करत इंग्लंडला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर आपला शंभरावा वनडे सामना खेळत असलेला रहमत शहा याला देखील त्याने केवळ तीन धावांवर बाद केले. तर, गुरबाज 80 धावांवर धावबाद झाला. त्याने 57 चेंडू मध्ये आठ चौकार व चार षटकार खेचले.त्यामुळे बिनबाद 114 अशी स्थिती असताना अफगाणिस्तानची तीन बाद 122 अशी पडझड झाली.
(Afganistan Derail After Flying Start From Gurbaj And Ibrahim)