वेस्ट इंडिजमध्ये आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना अफगाणिस्तान आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये पार पडला. हे दोन्ही संघ जेव्हा आमने सामने आले, त्यावेळी असे वाटले होते की, श्रीलंका संघ हा सामना आपल्या नावावर करून उपांत्य फरीत प्रवेश करेल. परंतु असे काहीच झाले नाही. या सामन्यात श्रीलंका संघाला पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान सामना झाल्यानंतर अफगाणिस्तान संघातील खेळाडूंनी जोरदार सेलिब्रेशन केले. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
कमी धावसंख्येच्या सामन्यात विजय मिळवणं थोडं कठीण असतं. ते ही सामना विश्वचषक स्पर्धेचा असेल तर हे काम आणखी कठीण होऊन जातं. परंतु अफगाणिस्तान संघाने माघार घेतली नाही. या सामन्यात अफगाणिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना अवघ्या १३४ धावा केल्या होत्या. या धावांचा बचाव करताना अफगाणिस्तान संघातील गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी केली. श्रीलंका संघाचा संपूर्ण डाव ४६ व्या षटकात अवघ्या १३० धावांवर संपुष्टात आला. हा सामना अफगानिस्तान संघाने ४ धावांनी आपल्या नावावर केला.
विजय मिळवल्यानंतर जोरदार जल्लोष
हा अफगाणिस्तान संघासाठी खूप मोठा विजय आहे. कारण विश्वचषक स्पर्धेत कमी धावसंख्येच्या सामन्यात विजय मिळवणे खूप मोठी गोष्ट आहे. त्यांनी इतर संघांना दाखवून दिले आहे की, त्यांच्या गोलंदाजी आक्रमणात दम आहे की, ते कमी धावांचा देखील बचाव करू शकतात. या विजयानंतर सर्व खेळाडू मैदानात जल्लोष करताना दिसून आले. तसेच एकमेकांचे अभिनंदन करताना दिसले. अफगाणिस्तान संघाची ही सांघिक कामगिरी पाहून, सोशल मीडियावर देखील त्यांचे जोरदार कौतुक होत आहे.
Celebrate the win boys!!
The Future stars have all the rights in the world to celebrate thier quarter final win over SL U19s. #FutureStars | #AFGvSL | #U19CWC2022 pic.twitter.com/SNmr2jtTIx
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) January 27, 2022
हा सामना झाल्यानंतर अफगाणिस्तान संघातील सर्व खेळाडूंनी एक रिंगण केले आणि अफगाणिस्तानचे पारंपरिक नृत्य अत्तान केले. हा विजय अफगाणिस्तान संघासाठी खूप मोठा विजय आहे. कारण अफगाणिस्तान संघ पहिल्यांदाच या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल झाला आहे.
महत्वाच्या बातम्या :
‘या’ कारणामुळे मायदेशात वनडे, टी२० मालिका खेळण्यापासून मुकला अश्विन, विडिंजविरुद्ध बसाव लागलं बाहेर
हे नक्की पाहा: