---Advertisement---

आशिया कपमध्ये उतरण्याआधीच टीम इंडियाच्या ‘या’ दोन प्रतिस्पर्ध्यांचे झाले खच्चीकरण

On: शुक्रवार, ऑगस्ट 12, 2022 4:08 PM
---Advertisement---

नुकताच भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडिज दौरा संपला आहे. यानंतर काही दिवसांची विश्रांती घेतल्यानंतर भारतीय संघ आशिया चषक २०२२ च्या तयारीला लागेल. आशिया चषकासाठी भारताच्या १५ सदस्यीय संघाची घोषणाही करण्यात आली आहे. सर्वप्रथम भारतीय संघ या स्पर्धेत क्वालिफायर संघ व पाकिस्तान यांच्याशी भिडावे लागेल. त्यानंतर सुपर फोरमध्ये आणखी दोन संघांशी भारताची गाठ पडेल. मात्र, आशिया चषकाआधी भारताच्या दोन प्रमुख प्रतिस्पर्धी संघाचे खच्चीकरण झालेले पाहायला मिळते.

बांगलादेशचा झिम्बाब्वे दौरा नुकताच संपला, जिथे त्यांना पहिल्यांदा टी२० मालिकेत पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर झालेली तीन सामन्यांची वनडे मालिका बांगलादेशने २-१ ने गमावली. बांगलादेशचा कर्णधार तमीम इक्बालने या दौऱ्यातील खराब कामगिरीनंतर बोलताना म्हटलेले की, आम्हाला आमच्यात आणखी सुधारणा करण्याची गरज आहे. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास काहीसा हरवलेला असेल.

दुसरीकडे, टी२० क्रिकेटमध्ये मागील काही काळापासून चमकदार कामगिरी केलेला अफगाणिस्तान क्रिकेट संघ सध्या आयर्लंडविरुद्ध खेळतोय. पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील दोन सामने खेळले गेले असून, दोन्ही सामन्यात अफगाणिस्तानला दारूण पराभव स्वीकारावा लागलाय. अशा परिस्थितीत या मालिकेत पुनरागमन करण्याचे आणि त्यानंतर आशिया चषकात शानदार कामगिरी करण्याचे आव्हान अफगाणिस्तान समोर असेल. ‌‌या दोन्ही संघांच्या खराब कामगिरीमुळे भारतीय संघ त्यांच्याविरुद्ध काही शान कमी दबावात खेळताना दिसेल. भारत गतविजेता म्हणून या स्पर्धेत सहभागी होणार आहे.

आशिया चषक २०२२साठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान.
स्टँडबाय – श्रेयस अय्यर, अक्षर पटेल आणि दीपक चहर.

महत्त्वाच्या बातम्या-

आशिया चषकापूर्वी सूर्यकुमार यादवने घेतली लक्झरी कार, किंमत ऐकुण तुम्हीही व्हाल हैरान

चांगला फॉर्म, सर्वाधिक धावा; तरीही आशिया चषकासाठी दुर्लक्षित राहिले ‘हे’ दोघे भारतीय

पाकिस्तानी खेळाडू यावर्षी भारतात क्रिकेट खेळणार? स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात होणार विशेष सामना

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---