जगभरात सध्या देशांतर्गत दौऱ्यांना सुरुवात झाली आहे. अफगाणिस्तानचा संघ सुद्धा सध्या झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात तीन एकदिवसीय सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. या मालिकेत अफगाणिस्तानने ३-०च्या फरकाने विजय मिळवत क्लीन स्विप केला आहे. या संपूर्ण मालिकेत नुकत्याच पूर्ण झालेल्या आयपीएल २०२२ मध्ये विशेष कामगिरी करणाऱ्या राशिद खान याने चमकदार कामगिरी केली.
या मालिकेतील शेवटच्या सामन्यात झिम्बाब्वेचा (Zimbabwe) संघ प्रथम खेळताना केवळ १३५ धावा करून बाद झाला. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानच्या (Afghanistan) फलंदाजांनाही संघर्ष करावा लागला. राशिदने (Rashid Khan) पहिल्या सामन्यात नाबाद ३९ धावा केल्या होत्या.लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर रहमतुल्ला गुरबाज (Rehmatullah Gurbaj) ७ आणि मागील सामन्यात शतक झळकावणारा इब्राहित जद्रान (Ibrahit Jadran) केवळ ८ धावा करू शकला. पहिल्या दोन सामन्यात ५० हून अधिक धावांची खेळी खेळणाऱ्या रहमत शाहलाही (Rehmat Shah) मोठी खेळी करता आली नाही. तो १७ धावा करून बाद झाला. संघाने ६० धावांत ४ विकेट गमावल्या. यानंतर कर्णधार हसमतुल्ला शाहिदीने ७० चेंडूत ३८ धावा करत संघाला ताब्यात घेतले.
मोहम्मद नबी (Mohammad Nabi)आणि शाहिदीने ५व्या विकेटसाठी४५ धावा जोडल्या. माजी कर्णधार आणि अष्टपैलू नबी ४७ चेंडूत ३४ धावा करून नाबाद राहिला. २ चौकार आणि एक षटकार मारला. राशिद खान ३ चेंडूत ६ धावा करून नाबाद राहिला. झिम्बाब्वेकडून मुजारबानी आणि तेंडेई चताराने प्रत्येकी २ बळी घेतले. तत्पूर्वी, यजमान झिम्बाब्वे संघ ४४.५ षटकांत १३५ धावांत गारद झाला. ६ फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही.
दरम्यान, झिम्बाब्वेने ४२ धावांत ४ विकेट गमावल्या. सिकंदर रझाने ३८ धावा करत संघाला सांभाळण्याचा प्रयत्न केला. रायन बर्लेनेही २१ धावा केल्या. अफगाणिस्तानकडून राशिद खानने ७.५ षटकात ३१ धावा देत ३ बळी घेतले. ऑफस्पिनर मोहम्मद नबीने ३१ धावांत २ बळी घेतले. फजलहक फारुकीलाही २ बळी मिळाले. या मालिकेत १९८ धावा करणाऱ्या रहमत शाहला प्लेयर ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळाला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
इंग्लंड दौऱ्यापूर्वी विराट कोहली पत्नी अनुष्कासंगे लुटतोय सुट्ट्यांचा आनंद, समुद्रकिनारी घालवला वेळ
आयर्लंड विरुद्धच्या टी२० मालिकेत बीसीसीआय ‘या’ खेळाडूंना दाखवणार बाहेरचा रस्ता?