वनडे विश्वचषक स्पर्धेनंतर आता भारतीय संघ पुन्हा एकदा द्विपक्षीय मालिकांसाठी सज्ज झाला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांचा दरम्यान 23 नोव्हेंबरपासून पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू होईल. यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. त्यानंतर आता भारताच्या आणखी एका मालिकेची घोषणा झाली असून, भारत मायदेशात अफगाणिस्तानविरुद्ध एक छोटेखानी टी20 मालिका खेळेल.
𝐈𝐍𝐃𝐈𝐀, 𝐖𝐄 𝐀𝐑𝐄 𝐂𝐎𝐌𝐈𝐍𝐆 𝐀𝐆𝐀𝐈𝐍 🚨
AfghanAtalan are all set to meet Team India in a three-match T20I series in early January next year. 🤩
More 👉: https://t.co/xQmpQtNWuR pic.twitter.com/BpITUbzM3W
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) November 21, 2023
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ व अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड यांनी या मालिकेची घोषणा केली. मागील दोन वर्षांपासून ही मालिका खेळण्यात येण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, व्यस्त वेळापत्रकामुळे ही मालिका शक्य झाली नव्हती. परंतु आता या मालिकेसाठी वेळ मिळाला आहे.
तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 11 जानेवारी रोजी मोहाली येथे खेळला जाईल. त्यानंतर दुसरा सामना 14 जानेवारी रोजी इंदोर येथे होईल. तर 17 जानेवारी रोजी होणाऱ्या अखेरच्या सामन्याचे यजमानपद बेंगलोरला मिळाले आहे. अफगाणिस्तान संघाचा हा भारताचा पहिलाच दौरा व पहिली मालिका असेल.
(Afghanistan Cricket Team Tour India In January For 3 T20I)
महत्वाच्या बातम्या –
पराभवानंतर भारतीय गोलंदाजाच्या घराला पोलीस सुरक्षा, चिडलेल्या चाहत्यांमुळे आधीच घेतली खबरदारी
आयसीसीचा श्रीलंकन क्रिकेट बोर्डाला तात्पुरता दिलासा, खेळण्याची दिली परवानगी पण…