इंडियन प्रीमियर लीगचा (IPL 2022) पंधरावा हंगाम लवकरच सुरू होईल. त्याआधी सर्व संघ मेगा लिलावात आपल्या संघाला मजबूत बनण्यासाठी प्रयत्न करतील. जगभरातील ५९० क्रिकेटपटूंवर या लिलावात बोली लावली जाईल. अनेक विदेशी खेळाडू या लिलावावर बारीक लक्ष ठेवून आहेत. अफगाणिस्तानचा विस्फोटक फलंदाज नजीबुल्ला झादरान (Najibullah Zadran) यानेदेखील या लिलावाबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाला नजीब
अफगाणिस्तान संघातील सर्वात आक्रमक फलंदाज म्हणून नजीबकडे पाहिले जाते. त्याची लीलया षटकार मारण्याची क्षमता आहे. त्याने आयपीएलच्या मेगा लिलावाआधी आपली प्रतिक्रिया दिली. यामध्ये त्याने यावर्षी आपण आयपीएल खेळू शकतो अशी आशा व्यक्त केली. तो म्हणाला,
“मी जगभरात भरपूर टी२० लीग खेळलो आहे. मात्र, मला या वर्षी आयपीएल खेळण्याची आशा आहे. ही एक प्रतिष्ठित लीग आहे. मी खेळलेल्या प्रत्येक लीगमध्ये परिस्थिती वेगळी होती. जसे की कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये फलंदाजांना तितकेसे फायदेशीर वातावरण नसते. मात्र, स्पर्धा अत्यंत काट्याची होते. मला अशाच वातावरणात खेळण्याची आवड आहे.”
अफगाणिस्तान संघाविषयी बोलताना नजीब म्हणला,
“आमच्या संघातील खेळाडूंकडे नैसर्गिक क्षमता आहे. सुरुवातीला आमच्याकडे योग्य त्या सुविधा नव्हत्या. मात्र प्रतिभा व आवड यामुळे आम्ही अनेक पाऊले पुढे आलो आहोत. मागील काही काळापासून आमचे खेळाडू सातत्याने चांगली कामगिरी करत नवनवे पराक्रम गाजवत आहेत.” अगदी कमी काळात अफगाणिस्तान संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा पूर्ण वेळ सदस्य बनला आहे. टी२० क्रिकेटमधील एक धोकादायक संघ म्हणून अफगाणिस्तानकडे पाहिले जाते.
आयपीएलमध्ये खेळतात तीन खेळाडू
आयपीएलमध्ये आतापर्यंत अफगाणिस्तानचे केवळ तीन खेळाडू खेळले आहेत. यामध्ये फिरकीपटू राशिद खान व मुजीब उर रहमान तसेच दिग्गज अष्टपैलू मोहम्मद नबी यांचा समावेश आहे. हे तीनही खेळाडू सनरायझर्स हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्व करत होते. मुजीब हा पंजाब संघासाठी देखील दोन हंगाम खेळला आहे. आयपीएल २०२२ पूर्वी राशिदला अहमदाबाद संघाने ड्राफ्ट केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
चूक भोवली! चेंडू छेडछाड प्रकरणात ‘या’ क्रिकेटरला मोठा दंड, संघाचेही झाले नुकसान (mahasports.in)
आयपीएलचा मेगा लिलाव करणारे ह्युज एडमिड्स आहेत तरी कोण? (mahasports.in)
IPL Memories| जेव्हा युवराजसाठी विजय मल्ल्यांनी लिलावात घातला गोंधळ (mahasports.in)