अफगाणिस्तान क्रिकेट संघासाठी 2023 हे वर्ष संस्मरणीय ठरले आहे. विश्वचषक 2023 च्या स्पर्धेत अफगाणिस्तान क्रिकेट संघाच्या कामगिरीने क्रिकेट जगताला आश्चर्याचा धक्का बसला. अफगाणिस्तानचे काही स्टार क्रिकेटपटू आधीच आयपीएलचा भाग आहेत आणि आणखी काही खेळाडू यावेळी आयपीएल लिलावात सहभागी होणार आहेत. 30 वर्षांचा नजीबुल्लाह झदरान हा एक अष्टपैलू फलंदाज आहे आणि सध्या तो जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. आयपीएल लिलावात काही फ्रँचायझी संघ नक्कीच त्याच्यावर लक्ष ठेवतील, परंतु त्याची नजर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर फ्रँचायझी संघावर आहे. या डावखुऱ्या फलंदाजाने अफगाणिस्तानसाठी 92 एकदिवसीय आणि 94 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.नजीबुल्लाच्या खात्यात 2060 एकदिवसीय आणि 1712 टी20 आंतरराष्ट्रीय धावा आहेत. आयपीएल 2024 चा लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबईत होणार आहे.
हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत नजीबुल्लाह झदरान (Najibullaha Zadran) याला जेव्हा विचारण्यात आले की, 2023 च्या विश्वचषकात विराट कोहली (Virat Kohli) याने नवीन-उल-हक याला ज्या प्रकारे सपोर्ट केला होता त्याबद्दल ड्रेसिंग रूममध्ये काही चर्चा झाली होती का? यावर तो म्हणाला, “नाही, याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. भारतात विराट कोहलीची फॅन फॉलोइंग प्रचंड आहे.” नवीन पुढे म्हणाला की, “आयपीएलदरम्यान नवीनला भारतात खूप पाठिंबा मिळतो. त्याचे लक्ष फक्त त्याच्या गोलंदाजीवर होते. मैदानावर जे काय होते, ते मैदानावरच राहते, यावर ड्रेसिंग रूममध्ये कोणतीही चर्चा होत नाही.”
आयपीएल लिलावाबाबत नजीबुल्लाहला विचारले असता तो म्हणाला, “प्रत्येक क्रिकेटरचे आयपीएलमध्ये खेळण्याचे स्वप्न असते. माझेही असे स्वप्न आहे. मला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळायचे आहे. विराट कोहलीने एकही आयपीएल ट्रॉफी जिंकलेली नाही, मला आशा आहे की यावेळी आम्ही आयपीएल ट्रॉफी जिंकू.” (Afghanistan cricketer Najibullah Zadran has only one goal Said Playing for RCB Virat)
महत्वाच्या बातम्या
WPL 2024 Auction: महिला खेळाडूंवर होणार कोट्यवधींची उधळण; कधी, कुठे आणि कसा पाहायचा लिलाव? घ्या जाणून
गंभीरशी भांडण करणं श्रीसंतला पडलं महागात! LLC कमिशनरने पाठवली लीगल नोटीस; म्हणाले, ‘जोपर्यंत तू…’