वनडे विश्वचषक 2023 स्पर्धा संपून आता तीन आठवडे होत आले आहेत. अशात आयसीसीने विश्वचषक 2023 स्पर्धेतील एकूण 7 खेळपट्ट्यांना रेटिंग दिली आहे. यामध्ये विश्वचषक 2023 अंतिम सामना पकडून 5 खेळपट्ट्या अशा आहेत, ज्यांना सरासरी रेटिंग मिळाली आहे. तसेच, फक्त 2 खेळपट्ट्यांना चांगली रेटिंग मिळाली आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, आयसीसीने अहमदाबाद (Ahmedabad) येथील नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये (Narendra Modi Stadium) पार पडलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघातील अंतिम सामन्यासाठी खेळपट्टीला सरासरी रेटिंग दिली आहे. तसेच, कोलकाता (Kolkata) येथील इडन गार्डन्स (Eden Gardens) मैदानावर खेळल्या गेलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील दुसऱ्या उपांत्य सामन्याच्यासाठी खेळपट्टीलाही सरासरी रेटिंग दिली आहे.
अंतिम सामन्यासाठी खेळपट्टीची रेटिंग आयसीीस सामनाधिकारी आणि झिम्बाब्वेचे माजी फलंदाज अँडी पायक्रॉफ्ट यांनी दिली होती. तसेच, दुसऱ्या उपांत्य सामन्यातील खेळपट्टीची रेटिंग भारताचे माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ यांनी दिली होती.
विश्वचषक 2023 अंतिम सामन्यात (World Cup 2023 Final) ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी त्यांनी भारतीय संघाला 240 धावांवर रोखले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने 43 षटकातच 241 धावा करत 6 विकेट्सने सामना जिंकला होता. तसेच, सहाव्यांदा ट्रॉफी नावावर केली होती. ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा हिरो ट्रेविस हेड ठरला होता. त्याने 120 चेंडूत 137 धावांची शानदार शतकी खेळी केली होती. तसेच, दुसऱ्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला 212 धावांवर रोखत आव्हान 7 विकेट्सच्या नुकसानीवर 47.2 षटकात 215 धावा करत पार केले होते.
https://twitter.com/mufaddal_vohra/status/1732956678147162604
एकूणच, स्पर्धेतील भारताच्या 11 पैकी 5 सामन्यांतील खेळपट्ट्यांना आयसीसीने सरासरी रेटिंग दिली आहे. अंतिम सामन्याव्यतिरिक्त, यजमान भारतीय संघाच्या कोलकातामधील दक्षिण आफ्रिकेविरुद्ध, लखनऊमध्ये इंग्लंडविरुद्ध, अहमदाबादमध्ये पाकिस्तानविरुद्ध आणि चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यांतील खेळपट्ट्यांना सरासरी रेटिंग दिली आहे.
दुसरीकडे, चकित करणारी बाब म्हणजे, वानखेडे स्टेडिअममध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात झालेल्या विश्वचषक उपांत्य सामन्यातील खेळपट्टी, जी मोठ्या वादात होती. असा दावा केला गेला होता की, अखेरच्या क्षणी ही खेळपट्टी बदलली होती, या खेळपट्टीली आयसीसीने चांगली रेटिंग दिली आहे. या खेळपट्टीवर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 397 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाचा डाव 48.5 षटकात 327 धावांवर संपुष्टात आला होता. (icc has given an average rating for 5 pitches including world cup 2023 final know here)
हेही वाचा-
‘Animal’मुळे देशभरात चर्चेत असलेल्या अभिनेत्रीने सांगितले आवडत्या क्रिकेटपटूचे नाव, तुम्हीच पाहा
‘घमंडी कुठचा… देव तुला कधीच माफ नाही करणार’, गंभीरच्या ‘त्या’ पोस्टवर भडकला श्रीसंत, LLC करणार चौकशी