---Advertisement---

‘घमंडी कुठचा… देव तुला कधीच माफ नाही करणार’, गंभीरच्या ‘त्या’ पोस्टवर भडकला श्रीसंत, LLC करणार चौकशी

S-Sreesanth-And-Gautam-Gambhir
---Advertisement---

Gautam Gambhir And S Sreesanth Controversy: बुधवारी (दि. 6 डिसेंबर) लीजेंड्स लीग क्रिकेट 2023 स्पर्धेतील एलिमिनेटर सामन्यात गौतम गंभीर आणि एस श्रीसंत यांच्यात वाद झाला होता. हे दोन्ही भारतीय माजी खेळाडू सूरतच्या लालाभाई कॉन्ट्रॅक्टर स्टेडिअममध्ये एकमेकांशी भिडले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर आगीसारखा पसरत आहे. दोघांचे भांडण मिटवण्यासाठी पंचांना हस्तक्षेप करावा लागला होता. श्रीसंतनेही सामन्यानंतर व्हिडिओ शेअर करत गंभीरवर टीका करत आरोपही लावले होते. यानंतर गंभीरने गुरुवारी (दि. 7 डिसेंबर) भारतीय जर्सीतील एक हसणारा फोटो शेअर केला. त्यानंतर आता श्रीसंतने या पोस्टवर पुन्हा एकदा संताप व्यक्त करत भलीमोठी कमेंट केली आहे.

गौतम गंभीरची इंस्टाग्राम पोस्ट
गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने एस श्रीसंत (S Sreesanth) याच्याशी भांडण (Fight) झाल्यानंतर गुरुवारी इंस्टाग्रामवर भारतीय जर्सीतील एक हसणारा फोटो शेअर केला. हा फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “जेव्हा संपूर्ण जगाचे लक्ष आपल्याकडे वेधून घ्यायचे असेल, तर हसत राहा.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Gautam Gambhir (@gautamgambhir55)

आता पूर्व दिल्लीचा भाजप खासदार असलेल्या गंभीरच्या या पोस्टवर श्रीसंत भडकला (S Sreesanth Angry On Gautam Gambhir) आहे. त्याने या पोस्टवर भलीमोठी कमेंट करत गंभीरला घमंडी म्हटले आहे. तो म्हणाला की, देवही गंभीरला माफ करणार नाही. श्रीसंतने लिहिले की, “तू एक खेळाडू आणि एका भावाची हद्द पार केली आहे. तू लोकांचे प्रतिनिधित्व करतो. तू प्रत्येक क्रिकेटपटूशी भांडत राहतो. तुझी समस्या काय आहे? मी फक्त हसून पाहिले आणि तू मला फिक्सर घोषित केले? खरंच? तू सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठा आहेस का? तुला असे बोलण्याचा आणि काहीही म्हणण्याचा काहीच अधिकार नाहीये.”

खरं तर, श्रीसंतवर आयपीएल 2013मध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरणातील कथित समावेशासाठी बीसीसीआयने कडक कारवाई करत आजीवन बंदी घातली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने 2019मध्ये ही बंदी कमी करत 7 वर्षे केली होती.

पुढे बोलताना श्रीसंत म्हणाला की, “तू पंचांसाठीही अपशब्द काढले, तरीही हसण्याच्या वार्ता करतो? तू एक घमंडी आणि पूर्णपणे दर्जाहीन व्यक्ती आहेस, ज्याकडे प्रेक्षकांसाठी कोणत्याही प्रकारचा आदर नाहीये. कालपर्यंत मी नेहमी तुझा आणि तुझ्या कुटुंबाचा आदर करत होतो. मात्र, तू अपमानास्पद शब्द ‘फिक्सर’चा वापर फक्त एकदा नाही, तर सात किंवा आठ वेळा केला. ज्यानेही याचा अनुभव घेतला की, मी काय सहन केले आहे, ते तुला कधीच माफ करणार नाहीत. तुला माहितीये की, तू जे काही म्हणाला आणि केले, ते चुकीचे होते. मला विश्वास आहे की, देवही तुला माफ करणार नाही.”

विशेष म्हणजे, श्रीसंतने त्याला ‘फिक्सर’ म्हणण्याचा आरोप लावल्यानंतर लीजेंड्स लीग क्रिकेटकडून सांगण्यात आले की, ते याची अंतर्गत चौकशी करतील. एलएलसीच्या आचार संहिता आणि नैतिक समितीचे प्रमुख सय्यद किरमानी यांनी गुरुवारी एका निवेदनात म्हटले की, “एलएलसी क्रिकेट आणि खिलाडूवृत्ती कायम राखण्याचा प्रयत्न करते. तसेच, आचार संहितेच्या या उल्लंघनासाठी एक अंतर्गत चौकशी केली जाईल. मैदान किंवा मैदानाबाहेर, तसेच, सोशल मीडियावर झालेल्या कोणत्याही चुकीच्या आचरणावर कठोर कारवाई केली जाईल.”

ते असेही म्हणाले की, “आचार संहितेमध्ये स्पष्टरीत्या सांगितले गेले आहे की, लीग, खिलाडूवृत्ती आणि ज्या संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत, त्याची बदनाम करण्यासाठी खेळाडूंवर कठोर कारवाई केली जाईल. आम्ही आमची बाजू स्पष्ट करतो आणि देश तसेच जगभरातील लाखो क्रीडाप्रेमींसोबत खेळ पोहोचवत राहणे आणि काम करणे सुरू ठेवू.”

गौतम गंभीर आणि एस श्रीसंत वादाची चौकशी झाल्यानंतर एलएलसी काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (s sreesanth reacts to gautam gambhir smile post after ugly fight said this llc will investigate the controversy)

हेही वाचा-
‘दोघांना एका खोलीत आणा आणि…’, वॉर्नर-जॉन्सन वादात रिकी पाँटिंगची उडी
इरफान पठाणकडून गौतम गंभीरचे समर्थन; पोस्ट करत म्हणाला, ‘हसणे हेच…’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---