आशियाई क्रीडा स्पर्धा 2023मध्ये क्रिकेट खेळाचा पहिल्यांदाच समावेश झाला होता. ही स्पर्धा टी20 क्रिकेट प्रकारात खेळली गेली. पुरुष स्पर्धेचा अंतिम सामना 7 ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात खेळला जाणार होता. मात्र, पावसामुळे सामना पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे स्थिती मजबूत असल्यामुळे भारताला विजयी घोषित करत सुवर्ण पदक देण्यात आले. मात्र, या निर्णयावर अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज फरीद अहमद याने प्रश्न उपस्थित केले आहेत.
काय म्हणाला फरीद?
अफगाणिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज फरीद अहमद (Fareed Ahmad) याच्या मते, भारत आणि अफगाणिस्तान (India vs Afghanistan) दोघांना सुवर्ण पदक द्यायला पाहिजे होते. माध्यमांशी बोलताना त्याने म्हटले, “हा खूपच विचित्र नियम होता की, भारतीय संघाला सुवर्ण पदक देण्यात आले. जर पाऊस झाला नसता, तर सामन्यात काट्याची टक्कर पाहायला मिळाली असती. त्यांना सुवर्ण पदक दोन्ही संघांमध्ये वाटायला पाहिजे होते. चीनचे चाहतेही खूपच मजेशीर होते. ते आम्हाला खेळताना पाहून खूपच उत्साही होते.”
सामन्याचा आढावा
एशियन गेम्स 2023 (Asian Games 2023) पुरुष टी20 स्पर्धेचा अंतिम सामना भारत विरुद्ध अफगाणिस्तान (India vs Afghanistan) संघात खेळला गेला. पावसामुळे सामना एक तास उशीरा सुरू झाला होता. अफगाणिस्तान संघाने या सामन्यात 18.2 षटकात 5 विकेट्स गमावत 112 धावांवर खेळत होता. त्याचवेळी पाऊस सुरू झाला. त्यानंतर निश्चित वेळेत सामना पुन्हा सुरू होऊ शकला नाही. त्यामुळे रँकिंगच्या आधारे भारतीय संघाला विजयी घोषित करण्यात आले.
यावेळी भारतीय संघ सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला. तसेच, अफगाणिस्तान संघाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. दुसरीकडे, पाकिस्तान संघाला पराभूत करून बांगलादेशने कांस्य पदकावर आपला हक्क सांगितला.
विशेष म्हणजे, भारतीय महिला संघानेही टी20 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेचा पराभव करत पहिले-वहिले सुवर्ण पदक जिंकण्याचा मान मिळवला होता. (afghanistan fast bowler not happy that indian team awarded gold medal in asian games 2023 know why here)
हेही वाचा-
रिझवानचा भीमपराक्रम! श्रीलंकेविरुद्धच्या तडाखेबंद शतकामुळे केला ‘हा’ विक्रम, 18 वर्षे जुना Record उद्ध्वस्त
दिल्लीत टीम इंडियापुढे अफगाणी आव्हान, पाहुण्यांनी जिंकला टॉस; रोहितसेनेतून स्टार खेळाडू बाहेर- Playing XI