आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीचे (ICC Champions Trophy) यजमानपद पाकिस्तानकडे आहे. दरम्यान आता अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी आपला संघ घोषित केला आहे. अफगाणिस्तानने रविवारी (12 जानेवारी) संध्याकाळी 15 -सदस्यांच्या संघाची घोषणा केली. त्यामध्ये राशीद खान (Rashid Khan) आणि इब्राहिम झादरान (Ibrahim Zadran) यांच्यासमवेत रहमानुल्लाह गुरबाज (Rahmanullah Gurbaz) यांनाही संधी देण्यात आली आहे.
अफगाणिस्तानने हॅशमातुल्लाह शहीदीवर (Hashmatullah Shahidi) महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली आहे. तो चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अफगाणिस्तान संघाची धुरा सांभाळताना दिसणार आहे. यासह, संघात 3 राखीव खेळाडूंना देखील स्थान देण्यात आले आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अफगाणिस्तान संघ- हशमातुल्लाह शहीदी (कर्णधार), इब्राहिम झादरन, रहमानुल्लाह गुरबाज, सेदिकुल्लाह अटल, रहमत शाह, इक्रम अलीखिल, गुलबदिन नायब, अझमतुल्लाह उमरझाई, मोहम्मद नबी, राशिद खान एएम गझनफर, नूर अहमद, फजलहक फारूकी, फरीद मलिक, नावेद झादरन
राखीव खेळाडू: दारविश रसुली, नांग्याल खारोटी, बिलाल सामी
Happy with our 15-member #AfghanAtalan lineup for the ICC Champions Trophy!? 🤩🏆#ChampionsTrophy 🔗: https://t.co/uZfvLZ8U8D pic.twitter.com/7bmUJuzHFb
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) January 12, 2025
महत्त्वाच्या बातम्या-
भारतीय संघानं मोडला 8 वर्ष जुना विक्रम, या खेळाडूनं ठोकलं करिअरचं पहिलं शतक
ऐकून विश्वास बसणार नाही! युवराज सिंगच्या वडिलांनी केली चक्क धोनीची प्रशंसा; VIDEO व्हायरल
हार्दिक-संजू संघात असताना अक्षर पटेलला उपकर्णधार का बनवलं? 3 प्रमुख कारणं जाणून घ्या