यंदाच्या विश्वचषक 2024 च्या स्पर्धेत साखळी सामन्यात अफगाणिस्तान संघाने आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. संघाच्या बाॅलिंग कोच ड्वेन ब्राव्होच्या मार्गदर्शनाखाली गोलंदाजांनी भेदक मारा करत स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आता संघाने सुपर-8 साठी पात्र ठरल्यानंतर संघासाठी वाईट बातमी समोर येत आहे.
वास्तविक, अफगाणिस्तान संघाचा स्टार फिरकीपटू मुजीब उर रहमान 2024 च्या टी20 विश्वचषकातून बाहेर पडला आहे. मुजीब उर रहमानच्या अंगठ्याला दुखापत झाल्याने त्याला उर्वरित सामने सोडून मायदेशी परतावे लागणार आहे. याच दुखापतीमुळे तो आयपीएलच्या 17 व्या मोसमातही सहभागी होऊ शकला नव्हता. मात्र, तंदुरुस्त झाल्यानंतर त्याला टी20 विश्वचषकासाठी अफगाणिस्तान संघात स्थान देण्यात आले होते. आता ही दुखापत आता पुन्हा उफाळून आली आहे. यामुळे त्याला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.
मुजीब-उर-रहमान युगांडाविरुद्ध एकमेव टी20 विश्वचषक सामना खेळला. पापुआ न्यू गिनीविरुद्धच्या सामन्यात दुखापतीमुळे तो बाहेर राहिला. आयसीसीच्या तांत्रिक समितीच्या मंजुरीनंतर अफगाणिस्तानने हजरतुल्ला झाझाईचा संघात समावेश केला आहे. झाझई त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. मुजीब जखमी असताना नूर अहमदने फिरकीची जबाबदारी घेतली आहे.
अफगाणिस्तान सुपर-8 साठी पात्र
अफगाणिस्तान संघाने यंदाच्या विश्वचषकात उल्लेखनीय कामगिरी करत सुपर-8 साठी पात्र ठरला आहे. संघाने आपल्या पहिल्या सामन्यात युगांडा विरुद्ध 125 धावांनी विजय मिळवला होता. तर न्यूझीलंड समोर संघाने शानदार कामगिरी करत 84 धावांनी एकतर्फी विजय मिळवला होता तर शेवटच्या सामन्यात पापुआ न्यू गिनी विरुद्ध 7 विकेट्सनी सामना जिंकला होता. स्पर्धेत सलग तीन सामने जिंकून अफगाणिस्तानने ची20 विश्वचषकात पहिल्यांदाच सुपर-8 साठी पात्र ठरला आहे.
महत्तवाच्या बातम्या-
टी20 विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच बनला ‘हा’ अनोखा रेकॉर्ड!
अजय जडेजा मोठ्या मनाचा खेळाडू, अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या सीईओनं केलं गुपित उघड
या 3 कारणांमुळे पाकिस्तानचा संघ टी20 विश्वचषकाच्या ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडला