30 मेपासून विश्वचषक 2019 ची स्पर्धा इंग्लंड आणि वेल्समध्ये रंगणार आहे. त्यामुळे आता जेमतेम दिड महिन्याचाच कालावधी राहिलेल्या या विश्वचषकासाठी सर्व संघांनी एकएक करत संघ घोषित करायला सुरुवात केली आहे.
न्यूझीलंडने काही दिवसांपूर्वी सर्वप्रथम 15 जणांचा संघ घोषित केला होता. त्यानंतर पाकिस्तानने संभाव्य 23 खेळाडूंचा संघ घोषित केला आहे. आता अफगाणिस्ताननेही विश्वचषकाआधी ट्रेनिंग कॅम्पसाठी 23 जणांचा संघ जाहिर केला आहे.
याबरोबरच अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने एक मोठा निर्णयही घेतला आहे. त्यांनी असगर अफगान याचे कर्णधारपद काढून घेतले आहे. त्याच्या ऐवजी तीन क्रिकेट प्रकारासाठी तीन वेगवेगळे कर्णधार नेमण्यात आले आहे.
त्यामुळे आता वनडे संघाचे नेतृत्व गुलबादीन नाईबकडे असेल, तर उपकर्णधारपद राशिद खानकडे असणार आहे. याबद्दल अफगाणिस्तानच्या निवड समीतीचे अध्यक्ष डावल्ट अहमदझाई म्हणाले, ‘असगर अफगाणने 4 वर्षे संघाचे नेतृत्व केले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली खूप यश मिळाले आणि देशाला त्याचा अभिमान आहे. मला विश्वास आहे नाईब त्याचा वारसा कायम ठेवेल.’
‘नाईब हा वरिष्ठ खेळाडू आहे. ज्याने मिस-ए-ऐनक संघाचे अनेकवेळा नेतृत्व केले आहे. आम्हाला आशा आहे तो अफगाणिस्तान संघाच्या भविष्यातील यशात महत्त्वाचा वाटा उचलेल.’
असगरचे जरी कर्णधारपद काढून घेतले असले तरी त्याचा विश्वचषकाआधी ट्रेनिंग कॅम्पसाठी जाहीर करण्यात आलेल्या 23 जणांच्या संघात समावेश करण्यात आला आहे.
हा 23 जणांचा संघ दक्षिण आफ्रिकेत 6 सराव सामने खेळेल त्यानंतर ते काबुल येथे परतील. यानंतर विश्वचषकासाठी 15 सदस्ययी संघाची निवड केली जाईल.
असा आहे विश्वचषकासाठी 23 जणांचा अफगाणिस्थानचा संभाव्य संघ –
गुलबदीन नाईब (कर्णधार), राशिद खान (उपकर्णधार), मोहम्मद शहजाद, नूर अली झारदान, हजरतुल्ला झझाई, उस्मान घणी, असगर अफगान, हशमतुल्ला शाहिदी, रहमत शाह, मोहम्मद नबी, नजीब झारदान, दारविश रसूली, मुजीब उर रहमान, शफीकुल्ला शाफाक, दावलत झारदान, आफताब आलम, शापूर झारदान, हामिद हसन, करीम जानत, काईस अहमद, शरफुद्दीन अशरफ, सय्यद शिरजाद, सामीउल्ला शिनवारी.
महत्त्वाच्या बातम्या –
–ऑस्ट्रेलियाच्या या माजी क्रिकेटपटूने वेष बदलून केली चेन्नईच्या मार्केटमध्ये खरेदी, पहा व्हिडिओ
–पंजाब विरुद्धच्या सामन्याआधी चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का…