---Advertisement---

धक्कादायक बातमी! ‘या’ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा भीषण अपघात, २४ तासांपासून कोमात

---Advertisement---

क्रिकेटप्रेमींसाठी एक वाईट बातमी आहे. अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा सलामीवीर नजीबुल्लाह तारकाईचा कार अपघात झाला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जाते. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी नाजीम जार यांनी क्रिकबज या क्रिकेट न्यूज वेबसाईटला दिलेल्या मुलखातीत ही माहिती दिली आहे.

क्रिकेट खेळू शकेल याबाबत आहे शंका

नजीबुल्लाच्या स्थितीबद्दल बोलतांना ते म्हणाले, “नजीबुल्लाची स्थिती अतिशय गंभीर आहे. तो मैदानात क्रिकेट खेळू शकेल की नाही हे सांगू शकत नाही. काल त्याचा अपघात झाला होता. तो रुग्णालयात असून त्याची प्रकृती गंभीर आहे. डॉक्टरांनी त्याला गंभीर दुखापत झाल्याचे सांगितले आहे.”

रस्ता ओलांडताना झाला अपघात

नजीबुल्लाह अफगाणिस्तानमधील पूर्व नानगरहार येथील किराणा दुकानातून सामान घेऊन परत येत होता. रस्ता ओलांडताना त्याला वेगवान वाहनाने धडक दिली आणि त्याच वेळी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही माध्यमातील वृत्तानुसार तो सध्या कोमात आहे.

पंच शिनवारी बॉम्बस्फोटात बचावले

शनिवारी (3 ऑक्टोबर) अफगाणिस्तानात बॉम्बस्फोटही झाला. क्रिकेट सामन्यांचे पंच बिस्मिल्लाह शिनवारीने थोडक्यात बचावले, परंतु त्यांच्या कुटुंबातील सात जण या अपघातात मरण पावले.

खेळाडूंना बसला धक्का

अफगाणिस्तानचे काही खेळाडू सध्या आयपीएलमध्ये खेळत आहेत, त्यांच्या साथीदाराचा अपघात झाला हे ऐकून त्यांना धक्का बसला असेल. अफगाणिस्तानच्या नजीबुल्लाहने राष्ट्रीय संघासाठी एक वनडे आणि 12 टी20 सामने खेळले आहेत.

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---