अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज शापूर झद्रानने वयाच्या 37 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 2009 मध्ये पदार्पण करणाऱ्या शापूरने 44 एकदिवसीय आणि 36 टी20 सामन्यांमध्ये एकूण 80 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2020 मध्ये खेळला. त्यानंतर त्याने सक्रिय क्रिकेटपासून स्वतःला दूर केले. 2009 मध्ये अफगाणिस्तान क्रिकेट संघात सामील झाल्यापासून, शापूरने देशासाठी अनेक महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे आणि क्रिकेटला एक नवीन दिशा दिली आहे. शापूर हा आक्रमक गोलंदाज म्हणून ओळखला जात होता. त्याच्या वेगवान गोलंदाजी आणि उंच उंचीमुळे तो आणखी धोकादायक बनला. तो शोएब अख्तरला आपला आदर्श मानत असे. शापूरने अनेक महत्त्वाच्या प्रसंगी त्याच्या गोलंदाजीने सामन्यांचा मार्ग निकाल बदलला आहे.
अफगाणिस्तान क्रिकेटला जागतिक स्तरावर स्थान मिळवून देण्यात शापूरने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 2015 च्या एकदिवसीय विश्वचषकात त्याची कामगिरी अत्यंत प्रभावी होती. ज्यात त्याने 26.50 च्या सरासरीने 10 विकेट्स घेतल्या. या दरम्यान त्याने स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, केन विल्यमसन, तिलकरत्ने दिलशान आणि महमुदुल्लाह सारख्या मोठ्या नावाजलेल्या फलंदाजांना बाद केले. या कामगिरीनंतर शापूरला जागतिक दर्जाचा गोलंदाज म्हणून ओळख मिळाली.
शापूरने 2015 मध्ये ड्युनेडिन येथे स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात सर्वात मोठी कामगिरी केली. त्याने अफगाणिस्तानच्या पहिल्या मोठ्या स्पर्धेतील विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्या सामन्यात त्याने 38 धावा देऊन 4 विकेट घेतल्या आणि नंतर 11 व्या क्रमांकावर फलंदाजी करताना नाबाद 12 धावा केल्या आणि अफगाणिस्तानने तीन चेंडू शिल्लक असताना एका विकेटने विजय मिळवला. अफगाणिस्तान क्रिकेटच्या इतिहासातील हा एक ऐतिहासिक क्षण होता आणि शापूरची कामगिरी नेहमीच लक्षात ठेवली जाईल.
Shapoor Zadran Calls Time on his International Career ????
Afghanistan’s big tall left-arm fast bowler Shapoor Zadran, a key figure in the rise of cricket in Afghanistan, announced his retirement from International cricket. He represented Afghanistan in 80 international matches… pic.twitter.com/46W3B4msHH
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) January 30, 2025
निवृत्तीच्या निर्णयाबद्दल बोलताना शापूर म्हणाला की, हा त्याच्या आयुष्यातील सर्वात कठीण निर्णय होता. त्याने त्याच्या फेसबुक पेजवर पोस्ट केले, ज्यामध्ये तो म्हणाला, “माझा प्रवास अफगाण क्रिकेटच्या सर्वात आव्हानात्मक काळात सुरू झाला. मी अडचणींचा सामना केला, मर्यादित संसाधनांसह खेळलो आणि अनेक अडथळ्यांवर मात केली, पण मी कधीही विश्वास गमावला नाही. क्रिकेट चाहते, माझे सहकारी, प्रशिक्षक आणि विशेषतः माझ्या कुटुंबाचे आभार ज्यांनी मला प्रत्येक अडचणीवर मात करण्यास मदत केली.”
हेही वाचा-
विराटला क्लीन बोल्ड करणारा हिमांशू सागवान आहे तरी कोण? पाहा आकडेवारी
चॅम्पियन्स ट्राॅफीपूर्वी संघाला मोठा धक्का, अष्टपैलू खेळाडू स्पर्धेतून बाहेर.!
चाहत्यांच्या अपेक्षांवर पुन्हा पाणी, विराट कोहलीकडून डोमेस्टिक क्रिकेटमध्येही धावा निघेना…!





