अफगानिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे संघात अबु धाबीच्या शेख जायेद स्टेडियमवर दुसरा कसोटी सामना चालू आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी एक विचित्र प्रकार घडला. अफगानिस्तानचा क्रिकेटपटू हशमतुल्लाह शाहिदी याने क्षेत्ररक्षण करतेवेळी असे काही कृत्य केले, ज्यामुळे पूर्ण संघाला शिक्षा भोगावी लागली. यावेळचे त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.
मैदानावर टिकून होता सिकंदर राजा
त्याचे झाले असे की, प्रथम फलंदाजी करताना अफगानिस्तान संघाने झिम्बाब्वे संघापुढे ५४६ धावांचे भलेमोठे लक्ष्य उभारले. प्रत्युत्तरात अफगानिस्तानचा संघ सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ८ बाद २१८ धावांवर खेळत होता. यावेळी फलंदाज सिकंदर राजा विकेट वाचवून नाबाद ७९ धावांवर एकाकी झुंज देत होता. अफगानिस्तानने आठवी विकेट गमावल्यानंतर ब्लेसिंग मुजारबानी नवव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला होता. मात्र १५ पेक्षा अधिक चेंडूंचा सामना केल्यानंतरही त्याला खाते खोलता आले नव्हते.
स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा सिकंदरचा प्रयत्न
दरम्यान एका षटकातील शेवटच्या चेंडूवर सिकंदरने कव्हरच्या दिशेने शॉट खेळला आणि एक धाव घेण्याचा प्रयत्न केला. जेणेकरुन पुढील षटकात पुन्हा तो स्ट्राईकवर येऊ शकेल. त्याने मारलेला चेंडू सीमीरेषेच्या काही इंच आधी जाऊन थांबला. तोपर्यंत सिकंदर आणि मुजारबानीने एक धाव पूर्ण केली होती.
मात्र सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत असलेल्या शाहिदीला सिकंदरची कल्पना समजली. त्यामुळे त्याने शक्कल लढवत मुद्दाम एक पाय सीमारेषेच्या बाहेर ठेवला आणि मग चेंडू पकडला.
क्षेत्ररक्षक शाहिदीने का असे केले
या चेंडूवर चौकार गेल्यास पुढील षटकात मुजारबानीकडे स्ट्राईक जाणार आणि अफगानिस्तानच्या गोलंदाजांना तळातील फलंदाजांना सहजरित्या बाद करण्याची संधी मिळणार. यामुळे झिम्बाब्वेचा डाव लवकर संपुष्टात येणार, या हेतूने शाहिदीने मुद्दाम हे कृत्य केले.
My personal opinion was a wilful act to cause the boundary so penalty runs + what the batsmen had run, but could well be wrong, happy for any corrections, any thoughts from an umpire @BumbleCricket
— GiraffePig (@ClarkeTom20) March 12, 2021
Afghanistan wanted to have a full crack at @BLESSINGMUZARA1 and perhaps that’s why to deny strike to @SRazaB24, Shahidi while fielding had one foot over the boundary. The umpires rightfully decided to give penalty for that deliberate effort by the fielder.
#AFGvZIM pic.twitter.com/nzVi8zC784— Satendra Singh, MD (@drsitu) March 12, 2021
पंचांनी दिली शिक्षा
अफगानिस्तानच्या खेळाडूच्या कृत्याची सामना पंच अहमद शाह पकतीन आणि अलीम डार यांनी पडताळणी केली. शाहिदीने मुद्दाम असे कृत्य केल्याचे पाहून आयसीसीच्या नियम १९.८ अंतर्गत झिम्बाब्वे संघाला एक धाव जास्तीची देण्यात आली. याबरोबरच पुढील षटकात सिकंदरकडे स्ट्राईक देण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या-
कोण जिंकणार विजय हजारे ट्रॉफी? अंतिम चुरशीसाठी आज मुंबई आणि उत्तर प्रदेश आमने-सामने
टीम इंडियाकडून पदार्पणास ‘हा’ खेळाडू सज्ज; म्हणाला, ‘कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्यास तयार’