---Advertisement---

INDvENG: भारत पुनरागमनासाठी तर इंग्लंड आघाडी टिकवण्यासाठी उत्सुक; दुसऱ्या टी२० बद्दल जाणून घ्या सर्वकाही

On: रविवार, मार्च 14, 2021 1:43 AM
---Advertisement---

अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात ५ टी२० सामन्यांची मालिका सुरु झाली आहे. या मालिकेतील दुसरा टी२० सामना रविवारी(१४ मार्च) रंगणार आहे. या सामन्यातून भारतीय संघ मालिकेत पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. तर इंग्लंड पहिल्या सामन्यात विजय मिळवत घेतलेली आघाडी टिकवण्यासाठी उत्सुक असेल.

मालिकेतील स्थिती

भारत आणि इंग्लंड संघातील टी२० मालिका शुक्रवारी (१२ मार्च) सुरु झाली. या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने ८ विकेट्सने जिंकला. त्यामुळे ५ सामन्यांच्या या मालिकेत इंग्लंडने १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता दुसरा सामना जिंकून मालिकेतील आघाडी भक्कम करण्याचा विचार इंग्लंडचा असणार आहे. तर भारतासमोर ओएन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या इंग्लंड संघाला पराभूत करत मालिकेत पुनरागमन करण्याचे आव्हान असणार आहे.

भारत आणि इंग्लंड संघाचा टी२० सामन्यांचा इतिहास

भारत आणि इंग्लंड संघ आत्तापर्यंत टी२० क्रिकेटमध्ये १५ वेळा आमने सामने आले आहेत. यातील ७ सामने भारताने जिंकले आहेत, तर ८ सामने इंग्लंडने जिंकले आहेत. यातील ७ सामने भारतात झाले आहेत. या ७ सामन्यांपैकी ३ सामने भारताने जिंकले आहेत, तर ४ सामने इंग्लंडने जिंकले आहेत. तसेच सध्या टी२० क्रमवारीत इंग्लंड आणि भारत अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यामुळे ही आकडेवारी पाहाता दोन्ही संघ तुल्यबळ असल्याचे लक्षात येते.

भारताच्या ११ जणांच्या संघात होऊ शकतो एक बदल

पहिल्या सामन्यात दारुण पराभव झाल्यानंतर भारताच्या अंतिम ११ जणांच्या संघ निवडीवर टीका झाली होती. त्यामुळे आता दुसऱ्या टी२० सामन्यासाठी भारताच्या अंतिम ११ जणांच्या संघात बदल होऊ शकतो. दुसऱ्या टी२० सामन्यासाठी अक्षर पटेल किंवा युजवेंद्र चहल यांच्यापैकी एकाला बाहेर बसावे लागू शकते. तसेच त्याजागी दीपक चाहरला अंतिम ११ जणांमध्ये संधी मिळू शकते.

तसेच इंग्लंड पहिल्या सामन्यात विजय मिळवला असल्याने आपला विजयी संघच दुसऱ्याच सामन्यातही कायम ठेवू शकतात. त्यामुळे इंग्लंड अंतिम ११ जणांच्या संघात बदल करण्याची शक्यता कमी आहे.

कधी, कुठे आणि केव्हा होणार भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा टी२० सामना घ्या जाणून –

१. भारत विरुद्ध इंग्लंड संघातील दुसरा टी२० सामना केव्हा होणार?
– भारत विरुद्ध इंग्लंड संघातील दुसरा टी२० सामना १४ मार्च रोजी खेळला जाणार आहे.

२. भारत विरुद्ध इंग्लंड संघातील दुसरा टी२० सामना कुठे खेळवला जाणार ?
– भारत विरुद्ध इंग्लंड संघातील दुसरा टी२० सामना नरेंद्र मोदी स्टेडियम, मोटेरा, अहमदाबाद येथे खेळवला जाईल.

३. भारत विरुद्ध इंग्लंड संघातील दुसरा टी२० सामना किती वाजता सुरु होणार ?
– भारत विरुद्ध इंग्लंड संघातील दुसरा टी२० सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.०० वाजता सुरु होईल. त्याआधी संध्याकाळी ६.३० वाजता नाणेफेक होईल.

४. भारत विरुद्ध इंग्लंड संघातील दुसऱ्या टी२० सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात कोणत्या चॅनेलवर पाहाता येईल ?
– भारत विरुद्ध इंग्लंड संघातील दुसऱ्या टी२० सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर पाहता येईल.

५. भारत विरुद्ध इंग्लंड संघातील दुसऱ्या टी२० सामन्याचे थेट प्रक्षेपण ऑनलाईन कसे पाहाता येईल ?
– भारत विरुद्ध इंग्लंड संघातील दुसऱ्या टी२० सामन्याचे थेट प्रक्षेपण ऑनलाईन हॉटस्टारवर पाहाता येईल.

यातून निवडला जाईल ११ जणांचा संघ – 

भारतीय संघ – रोहित शर्मा, केएल राहुल (यष्टीरक्षक), विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी, अक्षर पटेल, शिखर धवन, दीपक चाहर, श्रेयस अय्यर, राहुल तेवतिया, टी नटराजन, इशान किशन, राहुल चाहर

इंग्लंड संघ – जेसन रॉय, जोस बटलर (यष्टीरक्षक), डेव्हिड मालन, जॉनी बेअरस्टो, ओएन मॉर्गन (कर्णधार), बेन स्टोक्स, मोईन अली, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, जोफ्रा आर्चर, आदिल राशिद, सॅम बिलिंग्ज, रीस टोपली, मार्क वूड, टॉम करन, लियाम लिव्हिंगस्टोन.

महत्त्वाच्या बातम्या –

टीम इंडियाकडून पदार्पणास ‘हा’ खेळाडू सज्ज; म्हणाला, ‘कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्यास तयार’

शोएब अख्तरचा झाला सन्मान, ‘या’ प्रसिद्ध मैदानाला दिले गेले नाव

आता तरी द्या तो चेंडू! पहिल्या टी२० सामन्यादरम्यान हार्दिक पंड्या वैतागला प्रेक्षकांवर, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---