अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या वनडे मालिकेतील तिसरा सामनाही एकतर्फी झाला. अफगाणिस्ताननं पहिले दोन सामने एकहाती जिंकले होते. तर तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं अप्रतिम खेळ दाखवत 7 गडी राखून विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेनं आधी अफगाणिस्तानला 169 धावांत ऑलआउट केलं आणि त्यानंतर 33 षटकांत 170 धावा करून सामना जिंकला.
या सामन्यात अफगाणिस्ताननं प्रथम फलंदाजी केली. अफगाणिस्तानच्या फलंदाजी दरम्यान एक विचित्र घटना घडली, जी पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. 9व्या षटकात रहमत शाह खूपच विचित्र पद्धतीनं बाद झाला. झालं असं की, दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीनं फुल लेन्थ बॉल टाकला, ज्यावर रहमतुल्ला गुरबाजनं गोलंदाजाकडेच शॉट खेळला. एनगिडीनं चपळाई दाखवत चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला.
मात्र तोपर्यंत नॉन स्ट्रायकर रहमत शाह धाव घेण्यासाठी क्रीजबाहेर आला होता. एनगिडीच्या हातातून निसटलेला चेंडू क्रीजबाहेर आलेल्या रहमत शाहच्या खांद्यावर लागला. तेथून चेंडूनं दिशी बदलली आणि तो थेट स्टम्प्सवर जाऊन आदळला. अशाप्रकारे, रहमत शाह धावबाद झाला. त्यानं 6 चेंडूत अवघा 1 रन काढला. क्रिकेटच्या इतिहासातील हा सर्वात विचित्र रनआऊट आहे. तुम्ही या घटनेचा व्हिडिओ येथे पाहू शकता.
This is how Rahmat Shah got out Against South Africa ❤️😂😂😂 pic.twitter.com/kw9VSJb9sl
— Sports Production (@SportsProd37) September 22, 2024
या सामन्यात गुरबाजनं 94 चेंडूत 7 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीनं सर्वाधिक 89 धावांची खेळी केली. तर अल्लाह गझनफरनं शेवटच्या 15 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीनं नाबाद 31 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडी, नकाबा पीटर आणि फेहलुकवायो यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
दक्षिण आफ्रिकेनं 170 धावांचं लक्ष्य 33 षटकांत गाठलं. संघासाठी एडन मार्करमनं 67 चेंडूंत 4 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 69 धावांची खेळी केली. तर ट्रिस स्टब्सनं 42 चेंडूंत एक षटकार आणि एक चौकारासह नाबाद 26 धावा केल्या.
हेही वाचा –
श्रीलंकेचा जागतिक क्रिकेटमध्ये कमबॅक, पहिल्या कसोटीत न्यूझीलंडला धुतलं!
6 चौकार अन् 7 षटकार…मैदानावर पुन्हा आलं निकोलस पूरनचं वादळ!
भारत-बांगलादेश दुसरी कसोटी कधी आणि कुठे खेळली जाईल? टीव्हीवर लाईव्ह कुठे पाहायचा सामना?