नवी दिल्ली| अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू नजीब तारकाई याचे मंगळवारी (6 ऑक्टोबर) निधन झाले. काही दिवसांआधी त्याचा भीषण कार अपघात झाला होता. त्यानंतर 29 वर्षीय तारकाईला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तो कोमात होता. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी मीडिया व्यवस्थापक एम. इब्राहिम मोहम्मद यांनी त्याच्या निधनाबद्दलची बातमी दिली आहे.
Najeeb Tarakai, who met with an accident last week, has passed away at 29.
He played 13 internationals as a top-order batsman for Afghanistan. RIP. pic.twitter.com/EZysofcGPm
— ICC (@ICC) October 6, 2020
शुकवारी (2 ऑक्टोबर) रस्ता ओलांडात असताना त्याला कारने जोरदार धाडक दिली, त्यानंतर त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. इब्राहम मोहम्मद यांनी 3 ऑक्टोबर रोजी ट्वीट केले होते की, “गंभीर दुखापतीनंतर नजीबची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे. तो रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखेखाली आहे. 22 तासांपासून त्याने काहीच हालचाल केलेली नाही.”
https://twitter.com/IbrahimReporter/status/1312312342886088704?s=20
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने व्यक्त केला शोक
दरम्यान, तारकई यांच्या मृत्यूवर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (एसीबी) शोक व्यक्त केला आहे. क्रिकेट बोर्डाने ट्विटद्वारे त्याच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
एसीबीने ट्विट केले आहे की, “क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या एका चांगल्या व्यक्तीला आणि आक्रमक फलंदाजाला आज आम्ही गमावले. याबद्दल खूप दुःख झाले. अल्लाह त्याच्यावर दया करेल अशी आम्ही प्रार्थना करू.”
https://twitter.com/ACBofficials/status/1313305399580389377?s=20
तारकाईने 2014 मध्ये अफगाणिस्तानात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. टी20 विश्वचषकात त्याने बांगलादेशविरुद्ध पहिला सामना खेळला होता. त्यानंतर त्याने 12 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आणि 21.50 च्या सरासरीने आणि 122.85 च्या स्ट्राइक रेटने 258 धावा केल्या.
ग्रेटर नोएडा येथे मार्च 2017 मध्ये आयर्लंडविरुद्ध खेळताना त्याने सर्वाधिक 90 धावा केल्या. नजीबने मीरपूरमधील शेर-ए-बांगला स्टेडियम येथे सप्टेंबर 2019 मध्ये बांगलादेशविरूद्ध अंतिम आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. ही त्रिकोणी मालिका होती ज्यात झिम्बाब्वेचा देखील समावेश होता.






