शनिवारी (दि. 26 ऑगस्ट) श्रीलंकेच्या कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडिअमवर अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान संघात तिसरा वनडे सामना खेळला गेला. हा 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील अखेरचा सामना होता. हा सामना पाकिस्तानने 59 धावांनी आपल्या खिशात घातला. तसेच, मालिकाही 3-0ने नावावर केली. असे असले, तरीही सामन्यादरम्यान प्रेक्षकांमध्ये चांगलाच राडा झाला. चाहत्यांमध्ये झालेल्या बाचाबाचीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधत आहे. या व्हिडिओनुसार, ही बाचाबाची अफगाणिस्तान-पाकिस्तान संघातील तिसऱ्या सामन्यादरम्यान झाली.
व्हायरल व्हिडिओनुसार, अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान (Afghanistan vs Pakistan) संघातील तिसरा सामना पाहण्यासाठी आलेल्या श्रीलंकन क्रिकेट चाहत्यांनी पाकिस्तानच्या समर्थनार्थ संघाचा झेंडा आणि टोपी घातली होती. याचदरम्यान एक अफगाणी चाहताही देशाचा झेंडा हातात घेऊन त्या श्रीलंकन क्रिकेट चाहत्याला काहीतरी बोलताना दिसत आहे. मात्र, दोघांमध्ये काही वेळ बाचाबाची झाली आणि नंतर हे प्रकरण शांत करण्यात आले.
Well.. This is getting ugly now.. A Sri Lankan fan who support Pakistan vs an original Afghanistan fan. 🤦 #AFGVPAK pic.twitter.com/w82Ckzrnec
— Nibraz Ramzan (@nibraz88cricket) August 26, 2023
खरं तर, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान संघात खेळल्या गेलेल्या सामन्यात चाहत्यांमध्ये अशी बाचाबाची होण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वीही आशिया चषक (Asia Cup) स्पर्धेतही स्टेडिअममध्ये दोन्ही संघांच्या चाहत्यांमध्ये चांगलाच राडा झाला होता.
तिसऱ्या वनडेत पाकिस्तानचा विजय
वनडे मालिकेतील अखेरच्या सामन्यात पाकिस्तान संघाने अफगाणिस्तानला 59 धावांनी चिरडले. या विजयासोबतच पाकिस्तान संघाने मालिका 3-0ने नावावर केली. या सामन्यात पाकिस्तानने निर्धारित 50 षटकात 8 विकेट्स गमावत 268 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तान संघाचा डाव 48.4 षटकात 209 धावांवरच संपुष्टात आला. त्यामुळे पाकिस्तान संघाने सहजरीत्या हा सामना आणि मालिका आपल्या खिशात घातली.
या सामन्यात पाकिस्तानकडून फलंदाजी करताना दोन फलंदाजांना अर्धशतक करता आले. त्यात कर्णधार बाबर आझम (60) आणि मोहम्मद रिझवान (67) यांच्या नावाचा समावेश आहे. यावेळी अफगाणिस्तानकडून गोलंदाजी करताना फरीद अहमद आणि गुलबदीन नईब यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच, इतर 4पैकी 3 गोलंदाजांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
त्यानंतर अफगाणिस्तानकडून फलंदाजी करताना फक्त 1 फलंदाज अर्धशतक करू शकला. मुजीब उर रहमान याने 37 चेंडूत विस्फोटक 64 धावांची खेळी साकारली. इतर एकही फलंदाज खास प्रदर्शन करू शकला नाही. यावेळी पाकिस्तानकडून गोलंदाजी करताना शादाब खान चमकला त्याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच, इतर 5 पैकी 3 गोलंदाजांनी प्रत्येकी 2, तर एकाने 1 विकेट घेतली. (afghanistan supporter clashed with pakistan fan during match in stadium see viral video)
हेही वाचा-
वनडे मालिकेत यजमान अफगाणिस्तानला क्लीन स्वीप, पाकिस्तानने जिंकला सलग तिसरा वनडे सामना
IBSA World Games । भारतीय महिला अंध क्रिकेट संघाने रचला इतिहास, बनला गोल्ड जिंकणारा पहिला संघ