---Advertisement---

अफगाणिस्तानची टी२० विश्वचषकातून होणार गच्छंती? अजब आहे कारण

On: बुधवार, सप्टेंबर 22, 2021 11:39 PM
---Advertisement---

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढता अफगाणिस्तान क्रिकेट संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली ओळख बनवली आहे. सध्या अफगाणिस्तानचे अनेक क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये छाप पाडत आहेत. मात्र, आता या खेळाडूंच्या भविष्याबद्दल चिंता वाढली आहे. पुढील महिन्यात ओमान व संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे होणाऱ्या टी२० विश्वचषकात अफगाणिस्तानच्या सहभागाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, देशाचा ध्वजामुळे ही परिस्थिती ओढावू शकते.

क्रिकेट बोर्डावर अफगाणिस्तानची सत्ता
देशाची सत्ता काबीज केल्यानंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डावर देखील तालिबानची माणसे आली आहेत. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या सर्व सदस्यांनी राजीनामे दिले असून, बोर्डाचे अध्यक्ष हमीद शेनवारी यांच्या जागी नजीबुल्लाह हक्कानी यांना बोर्डाचे प्रमुख केले गेले आहे. तसेच, अफगाणिस्तानमध्ये महिलांना क्रिकेट खेळावर बंदी घालण्यात आली. तालिबानच्या या निर्णयाचा क्रिकेट जगतातून विरोध केला जात आहे.

या कारणामुळे विश्वचषकातील प्रवेशावर प्रश्नचिन्ह
तालिबान सरकार सत्तेत आल्यावर त्यांनी देशाचा पारंपारिक ध्वज बदलला आहे. हा पारंपारिक ध्वज काळ्या, लाल व हिरव्या रंगाचा होता. तालिबान सरकारने हा ध्वज वापरण्यास बंदी घातल्यास, आयसीसी कदाचित अफगाणिस्तान क्रिकेट संघाला विश्वचषकात खेळण्यासाठी परवानगी देणार नाही. अफगाणिस्तानच्या नव्या ध्वजाला केवळ पाकिस्तानचा पाठिंबा मिळू शकतो. कारण, पाकिस्तान सरकारने तालिबान सरकारला समर्थन दर्शविले आहे. मात्र, आयसीसीकडून या विषयावर अद्याप काहीही माहिती समोर आलेली नाही.

फगाणिस्तानची राजकीय स्थिती बिकट
अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ गणी यांची सत्ता उलथवून तालिबानने वीस वर्षानंतर पुन्हा एकदा अफगाणिस्तानवर कब्जा केला आहे. या कारणामुळे अफगाणिस्तानातील हजारो नागरिकांनी स्थलांतर सुरू केले असून, लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. अमेरिकन सैन्य पुन्हा एकदा अफगाणिस्तानात हजर झाले असून, ते अफगाणिस्तानच्या लोकांना मदत करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

DC vs SRH: दिल्लीचा एकतर्फी विजय! विलियम्सनच्या हैदराबादला ८ विकेट्सने नमवलं

मॅच विनिंग कामगिरी कार्तिक त्यागीची, पण चर्चा होतेय नीरज चोप्राची; पाहा काय आहे नक्की प्रकरण

वॉर्नरच्या सातत्याची अखेर! तब्बल ‘इतक्या’ वर्षांनी झाला शून्यावर बाद

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---