आशिया चषक २०२२ मध्ये मंगळवारी (30 ऑगस्ट) अफगाणिस्तान आणि बांगलादेश संघ आमने सामने आले होते. उभय संघातील रोमांचक होताच, पण स्टेडियममध्ये एक अशी व्यक्ती उपस्थिती होती, जिच्यामुळे चाहत्यांचा सामन्यासाठीचा आनंद अधिकच वाढला. या सामन्यात अफगाणिस्तानने 7 विकेट्स राखून विजय मिळवला आणि सुपर फोरमध्ये जागा पक्की केली. सुपर फोरमध्ये आता अफगाणिस्तान आणि भारत यांच्यात लढत होणार आहे. पण चाहत्यांनी या सामन्यापूर्वी एक खास मागणी केली आहे.
अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील हा सामना मंगळवारी शाहजाह स्टेडियवर खेळला गेला. अफगाणिस्तानने या सामन्यात प्रथम गोलंदाजी केली आणि बांगलादेश संघाला अवघ्या 127 धावांवर रोखले. बांगलादेशने 7 विकेट्सच्या नुकसानावर या धावा केल्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानी खेळाडूंनी अवघ्या 3 विकेट्सच्या नुकसानावर आणि 18.3 षटकांमध्ये हा सामना जिंकला. उभय संघातील हा सामना थरारक झाला असला, तरी चाहत्यांचे लक्ष्य मैदानात उपस्थित असलेल्या एका महिलेने अनेकदा विचलित केले. अफगाणिस्तानचा झेंडा हातात घेऊन सामना पाहणाऱ्या या महिलेचे नाव वाजमा अयूबी (Wazhma Ayoubi) असे आहे.
https://www.instagram.com/p/Ch1hwHPh06H/?utm_source=ig_web_copy_link
माध्यमांतील वृत्तांनुसार वाजमा अयूबी ही अफगाणिस्तानची व्यावसायिक महिला आहे आणि समोबतच ती समाजिक कार्यकर्ती देखील आहे. क्रीडा क्षेत्राची देखील तिला चांगलीच आवड असल्याचे समोर आले आहे. अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यादरम्यान वाजमा अफगाणिस्तानी खेळाडूंना प्रोत्साहन देताना दिसली. संघाला चीअर करतानाचे तिचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका चाहत्याने सोशल मीडियावर वाजमा अयूबीने भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील सामना पाहण्यासाठी येऊ नये, अशी थेट मागणीच केली आहे. या चाहत्याच्या मते वाजमा स्टेडियममध्ये आली, तर चाहते सामन्याकडे कमी आणि तिच्याकडेच जास्त पाहतात.
— Wazhma Ayoubi 🇦🇫 (@WazhmaAyoubi) August 30, 2022
Thank you @WazhmaAyoubi for Supporting #AfghanAtalan#SuperFan!#AFGvBAN #AFGvsBAN #AsiaCup2022 ❤️ pic.twitter.com/aqZYM7sJpa
— Afghan Atalan 🇦🇫 (@AfghanAtalan1) August 31, 2022
दरम्यान, अफगाणिस्तानने बांगलादेशला पराभूत करण्यापूर्वी श्रीलंकन संघाला देखील पराभवाची धूळ चारली आहे. या दोन विजयांच्या जोरावर संघ ‘ग्रुप बी’ सुपर फोरमध्ये पोहोचला आहे. ‘ग्रुप ए’ मधून भारतीय संघ सुपर फोरमध्ये दाखल झाले आहेत. भारताने पाकिस्तान आणि हाँगकाँग यांना पराभूत केले आहे. पाकिस्तानला त्यांचा दुसरा सामना शुक्रवारी (2 सप्टेंबर) खेळायचा आहे. पाकिस्तान हा सामना जिंकून सुपर फोरमध्ये प्रवेश करेल अशी अपेक्षा वर्तवली जात आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
सहा वर्षानंतर दिल्या सहा धावा! हाँगकाँग विरुद्ध विराट कोहलीची भन्नाट बॉलिंग
शानदार.. जबरदस्त.. जिंदाबाद.. जडेजाचा कमाल थ्रो पाहून विराटही चकित; रिऍक्शन होती पाहण्यासारखी
एकेकाळी घातलेला वाद, आता तोच विराट आपल्यापुढे नतमस्तक झाल्याचे पाहून सूर्यकुमार म्हणतोय…