अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यानंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेटर हसन रझा याने मोठे वक्तव्य केले आहे. त्यानी पुन्हा एकदा मोठा आरोप केला आहे. हसन रझा याच्या मते, अफगाणिस्तानला पहिल्या 20 षटकांमध्ये भारतीय चेंडू देण्यात आला होता आणि त्यामुळेच त्यांनी इतक्या विकेट्स घेतल्या आणि नंतर चेंडू बदलण्यात आला आणि त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने तुफानी खेळी केली.
एकेकाळी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात अफगाणिस्तानचा संघ विजयाच्या मार्गावर होता. त्यांनी ऑस्ट्रेलियाचे 7 विकेट्स 91 धावांत घेतले होते आणि त्यांचा विजय निश्चित दिसत होता, पण यानंतर त्यांनी ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) याला एक जीवदान दिले. याचा पुरेपूर फायदा घेत मॅक्सवेलने द्विशतक झळकावत संघाला विजय मिळवून दिला. मॅक्सवेलने अवघ्या 128 चेंडूत 21 चौकार आणि 10 षटकारांच्या मदतीने 201 धावांची नाबाद खेळी केली आणि संघाला विजयापर्यंत नेले.
हसन रझा (Hasan Raza) याच्या मते, या सामन्यात चेंडूशी छेडछाड करण्यात आली होती. तो म्हणाला, “भारताचा चेंडू 20 षटकांपूर्वी अफगाणिस्तानला देण्यात आला आणि त्यामुळेच नवीन उल हक इतका स्विंग आणि सीम होत होता. चेंडू पॅडवर आदळत स्विंग करत स्लिपमध्ये जात होता. 20 षटकांनंतर चेंडू बदलण्यात आला आणि त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने चांगली खेळी केली आणि द्विशतक केले.”
हसन रझा यानी यापूर्वीही आयसीसी भारतीय संघाची बाजू घेत असल्याचा आरोप केला होता. श्रीलंकेविरुद्ध भारतीय गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीनंतर तो म्हणाला होता की, “सामन्याच्या मध्यभागी चेंडू बदलला जातो आणि डीआरएसच्या बाबतीतही भारताला अनुकूलता दिली जाते. तो म्हणाला की, भारत जेव्हा गोलंदाजी करतो तेव्हा असे वाटते की, विकेट गोलंदाजीसाठी योग्य आहे. हसन रझा याच्या म्हणण्यानुसार, भारतीय गोलंदाज इतक्या विकेट्स कशा घेत आहेत, हे पाहण्यासाठी चेंडूचे परीक्षण केले पाहिजे.”
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अफगानिस्तान संघाने निर्धारित षटकात 5 विकेट्स गमावून 291 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलिया संघाने हे लक्ष 46.5 षटकात 7 विकेट्स गमावून गाठले. (Afghanistan were given the ball by India in the first 20 overs ex-Pakistan cricketer’s strange statement)
म्हत्वाच्या बातम्या
सत्ता आपलीच! नव्या गोलंदाजी क्रमवारीत टीम इंडियाचा पूर्ण तोफखाना ‘टॉप 10’मध्ये! सिराज पुन्हा नंबर वन