वनडे विश्वचषक 2023 मध्ये भारतीय संघाने सोमवारी (23 ऑक्टोबर) दुसरा विजय मिळवला. मोठी धावसंख्या करणून देखील बाबर आझम आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. अफगाणिस्तानसाठी त्यांच्या फलंदाजी क्रमातील पहिल्या चारही फलंदाजांनी मोठी खेळी केली आणि संघाला 8 विकेट्सने विजय मिळवून दिला. पाकिस्तानसाठी या सामन्यात सर्व गोष्टी प्रतिकूल ठरल्या.
अफगाणिस्तानला विजयासाठी या सामन्यात 283 धावांचे लक्ष्य मिळाले होते. या धावा त्यांनी 2 विकेट्सच्या नुकसानावर आणि 6 चेंडू राखून केल्या. सलामीवीर रहमनुल्लाह गुरबाझ याने 53 चेंडूत 65 धावांची खेळी केली, तर इब्राहिम जादरान याने 113 चेंडू खेळल्यानंतर 87 धावांचे योगदान दिले. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या रहमत शाह आणि चौथ्या क्रमांकावर खेळणारा हसमदुल्लाह शाहिदी यांनी महत्वाची भागीदारी केली. रहमत शाह याने 77 तर कर्णधार शाहिदीने 48 धावांची खेळी केली.
तत्पूर्वी पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. निर्धारीत 50 षटकात पाकिस्तान संघ 7 विकेट्सच्या नुकसानावर 282 धावांपर्यंत मजल मारू शकला. कर्णधार बाबर आझम याने 92 चेंडूत 74 धावांची सर्वोत्तम खेळी केली. मात्र, संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. सलामीवीर अब्दुल्लाह शफीक यानेही 75 चेंडूत 58 धावांची महत्वपूर्ण खेळी केली.
दरम्यान, अफगाणिस्तान संघासाठी हा विश्वचषक 2023 मधील पहिल्या पाच सामन्यांमध्ये दुसरा विजय ठरला. दुसरीकडे पाकिस्तान संघ पाच पैकी तिसऱ्या पराभवाला समोरे गेला.
(Afghanistan won by eight wickets in the match against Pakistan)
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन –
पाकिस्तान – अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, उसामा मीर, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ
अफगाणिस्तान – रहमानुल्लाह गुरबाज, इब्राहिम जादरान, रहमत शाह, हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), अजमतुल्ला उमरझाई, इक्रम अलखिल (यष्टीरक्षक), मोहम्मद नबी, राशिद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक, नूर अहमद.
महत्वाच्या बातम्या –
VIDEO । बाबरच्या शुजची लेस बांधण्यासाठी आला नबी, पाकिस्तानी कर्णधाराच्या एका गोष्टीने जिंकले सर्वांचे मन
किंग कोहलीचा वनडेत ‘विराट’ विक्रम, ‘या’ बाबतीत श्रीलंकन दिग्गजाला टाकलं मागे