टी20 विश्वचषकाच्या ऐनआधी इंग्लंडचा क्रिकेट संघ 17 वर्षानंतर पहिल्यांदा पाकिस्तान दौऱ्यासाठी गुरुवारी (15 सप्टेंबर) कराचीला पोहोचला आहे. इतके वर्ष सुरक्षेच्या कारणास्तव इंग्लंडने पाकिस्तान दौरा न करण्याचा निर्णय घेतला होता. इंग्लंडने 2005 मध्ये पाकिस्तानमध्ये शेवटचा सामना खेळलेला .इंग्लंडचा संघ मागील वर्षीच पाकिस्तानचा दौरा करणार होता. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव न्यूझीलंडने दौरा रद्द केल्याने, इंग्लंड क्रिकेट बोर्डानेही माघार घेतली होती. या दौऱ्यावर उभय संघांमध्ये 7 सामन्यांची लांबलचक टी20 मालिका खेळली जाईल.
न्यूझीलंड आणि इंग्लंड बोर्डाच्या या निर्णयांमुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने तीव्र नाराजी व्यक्त केलेली. कारण, पाकिस्तानात पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुनर्जीवित करण्यासाठी सुरक्षेची हमी पाकिस्तान बोर्डाने दिली होती.
Welcome to Pakistan, @englandcricket 🙌
Show your excitement for the upcoming T20I series with an emoji 👇#PAKvENG pic.twitter.com/HxzBIDM0rw
— Pakistan Cricket (@TheRealPCB) September 15, 2022
लाहोरमध्ये 2009 मध्ये श्रीलंकन संघाच्या बसवर दहशतवाद्यांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर, पाकिस्तान संयुक्त अरब अमिरातीसारख्या तटस्थ ठिकाणी आपले घरचे मैदान म्हणून खेळत होता. जिथे त्यांनी 2012 आणि 2015 मध्ये इंग्लंडविरुद्ध मालिका आयोजित केलेल्या.
मागील पाच वर्षांपासून पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन झाले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाचा संघ तब्बल 24 वर्षांनंतर पाकिस्तानच्या दौऱ्यावर आला होता. हा दौरा यशस्वीरित्या पार देखील पडला.
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड टी20 विश्वचषक आणि इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी गुरुवारी संघाची घोषणा करू शकते. जोस बटलरच्या नेतृत्वाखाली 19 जणांचा इंग्लंड संघ 20 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत कराची आणि लाहोरमध्ये पाकिस्तानविरुद्ध सात टी20 सामने खेळणार आहे. आगामी T20 विश्वचषकाच्या दृष्टीने ही मालिका दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. इंग्लंडचा संघ डिसेंबरमध्ये तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी पुन्हा एकदा पाकिस्तानात दाखल होईल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी20 विश्वचषकासाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर, आशिया चषकातील 5 खेळाडूंची हाकालपट्टी
राजस्थान रॉयल्सच्या फ्रॅंचायजीचा हेड कोच झाला जेपी डुमिनी, कोचिंग स्टाफची यादीही झाली जाहीर
एलिसा पेरीने तोडला विश्वविक्रम, ‘इतके’ किमी पळत येत डेविड वॉर्नरला केली बॉलिंग