पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी नेहमीच चर्चेत असतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली, तरीही माध्यमांमद्ये त्याची आजही तितकीच चर्चा असते, जेवढी त्याच्या मैदानांमधील वादांची होत असायची. आफ्रिदीने इंग्लंडविरुद्धच्या एका कसोटी सामन्यात 2005 साली खेळपट्टीशी छेडछाड केली होती. आता त्याने ही चूक सर्वांसमोर मान्य केली आहे.
पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेचा हा दुसरा सामना होता. उभय संघातील हा सामना फैसलाबादमध्ये खेळला जात होता. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) याने लाईव्ह सामन्यात खेळपट्टीव खराब करण्यासाठी प्रयत्न केला. हा प्रकार समजल्यानंतर त्याच्यावर बंदी देखील घातली गेली होती. त्याला पुढच्या एका कसोटी आणि दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळता आले नव्हते. आता या सामन्याविषयी बोलताना त्याने स्वतःची चूक मान्य केली आहे.
इंग्लंडविरुद्धचा या सामन्याला तब्बल 17 वर्ष झाली आहेत आणि आफ्रिदीने आता स्वतःची चूक मान्य केली. तो म्हणाला की, “ती एका चांगली मालिका होती. विश्वास ठेवा हा एक कसोटी सामना होता, ज्यामध्ये चेंडू जराही टर्न होत नव्हवा आणि स्विंग किंवा सिम देखील होत नव्हता. मी पूर्ण ताकतीने गोलंदाजी करत होतो, पण काहीच फरक पडताना दिसत नव्हता. पण तितक्यात गॅस सिलेंडरचा फुटला आणि सर्वांचे लक्ष त्याकडे गेले. तेव्हा मी शोएब मलिकला म्हणालो की, माझी इच्छा होत आहे की, मी इथे पॅच (खड्डा) करावा, किमान चेंडू तरी वळेल. मलिकही मला म्हणाला की, करून टाक कोणीच पाहत नाहीये. मालिकचे ऐकून मी देखील तसेच केले. आता जेव्हा या गोष्टीकडे मागे वळून पाहतो, तर वाईट वाटते की, मी चूक केली होती.”
दरम्यान आफ्रिदीने मर्यादिक षटकांच्या क्रिकेटमध्ये पाकिस्तानसाठी मोठे योगदान दिले आहे. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 398 सामने खेळले आहेत, तर 99 टी-20 सामन्यांची नोंद त्याच्या नावापुढे आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याला जास्त सामने खेळता आले नाहीत. त्याने कारकिर्दीत एकूण 27 कसोटी सामने खेळले. आफ्रिदीने खेळपट्टीशी छेडछाड केलीच, पण 2010 साली पुन्हा एकदा असाच एक प्रकार केला होता. यावेळी त्याने चेंडूशी छेडछाड केल्यामुळे आयसीसीने त्याच्यावर दोन टी-20 सामन्यांची बंदी घातली होती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
T20WC | ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्टीवर ‘तो’ महागात पडेल, भारतीय गोलंदाजाविषयी दिग्गजाची मोठी प्रतिक्रिया
आनंदाची बातमी! अखेर बुमराह उतरणार मैदानात; सूर्याने केले कन्फर्म
‘याला काय अर्थ आहे, त्याला संधी दिली पाहिजे’, वाचा कुणाविषयी बोलला मॅथ्यू हेडन