---Advertisement---

INDvNZ: दुसर्‍या कसोटी सामन्यातील भारताच्या ‘या’ शिलेदाराबद्दल माहितीये का? पराक्रम वाचून शॉक व्हाल

---Advertisement---

भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरू आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरू आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली पार पडलेला पहिला कसोटी सामना अनिर्णीत राहिला होता, तर दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहलीचे पुनरागमन झाले आहे. तसेच या सामन्यासाठी भारतीय संघात काही महत्वाचे बदल करण्यात आले आहे. त्यापैकीच एक खेळाडू असा आहे, ज्याने याच मैदानावर तुफानी खेळी केली होती. आता तब्बल ४ वर्षानंतर त्याला पुनरागमन करण्याची संधी मिळाली आहे.

दुसरा कसोटी सामना सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघाला वाईट बातमी मिळाली. भारतीय संघातील दिग्गज खेळाडू अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा आणि ईशांत शर्मा हे तिघेही दुखापतीमुळे भारतीय संघातून बाहेर झाले आहेत. अजिंक्य रहाणे ऐवजी कर्णधार विराट कोहलीचे पुनरागमन झाले आहे, तर ईशांत शर्माच्या जागी मोहम्मद सिराजला संधी देण्यात आली.

तसेच रवींद्र जडेजाच्या जागी संधी मिळालेल्या जयंत यादवचे या मैदानासोबत एक खास नाते आहे. त्याने याच मैदानावर ४ वर्षांपूर्वी शतक झळकावले होते आणि आता तब्बल ४ वर्षानंतर तो याच मैदानावर पुनरागमन करतोय.

वानखेडेच्या मैदानावर झळकावले होते शतक 

जयंत यादवने याच मैदानावर ४ वर्षांपूर्वी आपल्या कसोटी कारकिर्दीतील एकमेव शतक झळकावले होते. हे शतक त्याने इंग्लंड संघाविरुद्ध झळकावले होते. याच शतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले होते. हा सामना भारतीय संघाने एक डाव आणि ३६ धावांनी आपल्या नावावर केला होता.

या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ४०० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय फलंदाजांनी देखील अप्रतिम फलंदाजी केली होती. सलामीवीर फलंदाज मुरली विजयने १३६ धावांची खेळी केली होती, तर कर्णधार विराट कोहलीने २३५ धावांची खेळी केली होती. त्यावेळी जयंत यादव ९ व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला होता. त्याने विराट कोहली सोबत मिळून २४१ धावांची भागीदारी केली होती. त्याने २०४ चेंडूंचा सामना करत १०४ धावांची खेळी केली होती. यासह तो भारतीय संघाकडून ९ व्या क्रमांकावर शतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरला होता.

जयंत यादवची कामगिरी
जयंत यादवने आत्तापर्यंत ४ कसोटी सामने खेळले असून ११ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबरल १ शतक आणि १ अर्धशतकासह २२८ धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने १ वनडे सामनाही खेळला असून यात १ विकेट घेतली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

सीएसके संघ आयपीएल मेगा लिलावात सर्वात आधी खरेदी करणार ‘हा’ खेळाडू?

ओम्रिकॉनची दहशत, भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी यजमानांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

दक्षिण आफ्रिकेत भारतीय फलंदाजाची बॅट ओकतेय आग!! कसोटीत झळकावले वनडे स्टाईल अर्धशतक

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---