Thursday, March 23, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्ले-ऑफचे तिकीट ते टेबल टॉपर, 5वा विजय मिळवताच मुंबईने केले ‘हे’ 4 कारनामे; क्रिकेटप्रेमींनी वाचाच

प्ले-ऑफचे तिकीट ते टेबल टॉपर, 5वा विजय मिळवताच मुंबईने केले 'हे' 4 कारनामे; क्रिकेटप्रेमींनी वाचाच

March 15, 2023
in WPL, क्रिकेट, टॉप बातम्या
Harmanpreet-Kaur

Photo Courtesy: Twitter/wplt20


मुंबई इंडियन्स संघाने महिला प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत कुणाचे वर्चस्व आहे, हे मंगळवारी (दि. 14 मार्च) ब्रेबॉर्न स्टेडिअमवर झालेल्या 12व्या सामन्यात दाखवून दिले. मुंबईने या सामन्यात गुजरात जायंट्स महिला संघाला 55 धावांनी पराभवाचा धक्का दिला. या विजयात जेवढे योगदान मुंबईच्या गोलंदाजांचे होते, तेवढेच योगदान कर्णधार हरमनप्रीत कौर हिचेही होते. हरमनप्रीतने चांगल्या रणनीतीने गोलंदाजांकडून गुजरातच्या गोलंदाजांच्या विकेट्स काढून घेतल्या. विशेष म्हणजे, गुजरातविरुद्धच्या विजयाने मुंबई इंडियन्स आणि त्यांची कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी 4 खास कारनामे केले आहेत. कोणते आहेत ते कारनामे, चला जाणून घेऊयात…

मुंबई इंडियन्स संघाचे 4 कारनामे
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने स्पर्धेतील 12व्या आणि वैयक्तिक 5व्या सामन्यात शानदार विजय साकारला. या विजयासोबत मुंबईने 4 कारनामे केले. त्यातील पहिला कारनामा असा की, मुंबईने सलग पाच विजय मिळवले. त्यांनी स्पर्धेत आतापर्यंत खेळलेल्या पाचही सामन्यात विजय मिळवला. हे विजयदेखील मोठ्या फरकाने मिळवले आहेत. यातील दुसरा कारनामा असा की, विजय मिळवताच मुंबई संघ थेट प्ले-ऑफ फेरीसाठी पात्र ठरला आहे. त्यानंतर तिसरा कारनामा म्हणजे, मुंबईने पाचवा सामना जिंकताच 10 गुण मिळवले. त्यामुळे गुणतालिकेत त्यांनी अव्वलस्थान कायम राखले.

𝐅𝐈𝐕𝐄 𝐒𝐓𝐀𝐑 𝐏𝐄𝐑𝐅𝐎𝐑𝐌𝐀𝐍𝐂𝐄 ⭐⭐⭐⭐⭐#OneFamily #MumbaiIndians #AaliRe #MIvGG pic.twitter.com/V4PUv4Iz06

— Mumbai Indians (@mipaltan) March 14, 2023

हरमनप्रीतचाही खास पराक्रम
आता राहिला शेवटचा कारनामा. हा कारनामा करण्याचा मान मुंबई इंडियन्स संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिला मिळाला. हरमनने या सामन्यात 30 चेंडूत 51 धावांची खेळी साकारली. यामध्ये 2 षटकार आणि 7 चौकारांचा समावेश होता. यासाठी तिला सामनावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आले. या खेळीसह तिने 4 डावात 3 अर्धशतके ठोकली. अशाप्रकारे, मुंबईने हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली शानदार कामगिरी करताना दिसत आहे.

An all round dominating performance by @mipaltan 💪@ImHarmanpreet scored a brilliant 5️⃣1️⃣ to help her side win 5 matches in a row! She is our Player of the Match 👏#TATAWPL | #MIvGG pic.twitter.com/YjM73PoG66

— Women's Premier League (WPL) (@wplt20) March 14, 2023

सामन्याचा आढावा
या सामन्यात गुजरात जायंट्स संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी मुंबईने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 8 विकेट्स गमावत 162 धावांचा डोंगर उभारला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरात संघाला 20 षटकात 9 विकेट्स गमावत 107 धावाच करतात आल्या. त्यामुळे मुंबईने हा सामना 55 धावांनी जिंकला. यावेळी मुंबईकडून गोलंदाजी करताना दोन गोलंदाजांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. त्यात नॅट सायव्हर-ब्रंट आणि हेली मॅथ्यूज यांच्या नावाचा समावेश आहे. दुसरीकडे, गुजरातकडून गोलंदाजी करताना ऍशले गार्डनर हिने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या होत्या. (after 5th match won Mumbai Indians And Captain Harmanpreet Kaur did this things know here)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबईच्या विजय रथाखाली चिरडली गुजरात! 55 धावांनी विजय मिळवत हरमनसेना प्ले-ऑफसाठी क्वालिफाय
आहा कडकच ना! WPLमधील सर्वात सुंदर महिला आहे RCBची क्रिकेटर, इंस्टाग्रामवर ‘एवढे’ लाख लोक करतात फॉलो


Next Post
MSD-And-Rohit-Sharma-And-Harmanpreet-Kaur

हरमनप्रीत आहे WPLचे सलग 5 सामने जिंकणारी कर्णधार, पण IPLमध्ये अशी कामगिरी करणारा कॅप्टन कोण?

Sunil-Gavaskar-And-Dinesh-Karthik

काय दिवस आलेत! फिनिशर दिनेश कार्तिकने गावसकरांना दिले फलंदाजीचे धडे, 25 लाख लोकांनी पाहिला व्हिडिओ

Shakib-Al-Hasan

विश्वविजेत्या इंग्लंडच्या 'या' कमजोरीमुळे बांगलादेशने जिंकली टी20 मालिका, कर्णधार शाकिबचा मोठा खुलासा

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143