---Advertisement---

दिल्लीला दिलासा! ‘या’ खेळाडूचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल होता चुकीचा; आता फलंदाजांवर आग गोळे फेकण्यास तयार

On: शनिवार, एप्रिल 17, 2021 1:32 AM
---Advertisement---

आयपीएल २०२१ कोरोनाच्या सावटाखाली सुरु झाली आहे. दरम्यान काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाली असल्याचेही समोर आले होते. पण दिलासादायक गोष्ट ही होती की ज्या खेळाडूंचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले होते, ते खेळाडू आधीच अनिवार्य क्वारंटाईन कालावधी पूर्ण करत होते. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या खेळाडूंमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणारा दक्षिण आफ्रिकेचा एन्रीच नॉर्किए हा देखील होता. पण आता असे समोर आले आहे की त्याचा कोरोना अहवाल चुकीचा होता. त्यामुळे आता तो दिल्ली संघाशी जोडला गेला आहे.

नॉर्किए हा पाकिस्तान विरुद्ध मायदेशात झालेल्या वनडे मालिकेतील पहिले २ सामने खेळल्यानंतर ६ एप्रिलला भारतात आला होता. त्यानंतर नियमाप्रमाणे त्याला ७ दिवस क्वारंटाईनमध्ये रहावे लागणार होते. त्याचा क्वारंटाईन कालावधी १३ एप्रिलला संपणार होता. पण त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याला आणखी काही दिवस आयसोलेशनमध्ये राहणे बंधनकारक होते.

पण नंतर २ दिवसात त्याच्या पुन्हा आरटी पीसीआर चाचण्या करण्यात आल्या. त्यात त्याचा अहवाल निगेटीव्ह आला. त्यामुळे आयपीएलच्या नियमानुसार खेळाडूच्या तीन चाचण्या निगेटिव्ह आल्यानंतर त्याला संघाशी जोडला जण्याची परवानगी आहे.

याबद्दल दिल्ली कॅपिटल्सने सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली की ‘आमचा वेगवान गोलंदाज (नॉर्किए) क्वारंटाईनमधून बाहेर आला आहे. कोविड-१९ चा चुकीचा पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर एन्रीच नॉर्किएचे तीन अहवाल निगेटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे तो आता आमच्या संघाच्या बायोबबलचा बाग झाला आहे. आम्हाला त्याला गोलंदाजी करताना पाहाण्याची उत्सुकता आहे.’

नॉर्किएने मागच्या सत्रात दिल्ली संघासाठी चांगली कामगिरी केली होती. तो मागीलवर्षी दिल्लीसाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज होता. त्याने १६ सामन्यांत २२ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच आयपीएल इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचाही पराक्रम त्याने केला होता. त्याने राजस्थान रॉयल्स विरुद्ध १५६ ताशी किलोमीटर वेगाने चेंडू टाकला होता.

नॉर्किए आता आयपीएल २०२१ साठी संघात जोडला गेला असल्याने दिल्लीला दिलासा मिळाला आहे. कारण, याआधीच दिल्लीचा अष्टपैलू क्रिकेटपटू अक्षर पटेलही कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. तो सध्या क्वारंटाईन असून उपचार घेत आहे. तसेच दिल्लीचा नियमित कर्णधार श्रेयस अय्यरही या हंगामात खांद्याच्या दुखापतीमुळे खेळणार नाही. त्याच्याऐवजी रिषभ पंत यंदा दिल्लीचे नेतृत्व करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

सलग २ पराभवानंतर हैदराबाद संघासाठी आनंदाची बातमी, ‘तो’ दिग्गज खेळाडू मैदानात परतण्यास होतोय सज्ज

Video: डू प्लेसिस बाद मग पुन्हा नाबाद; चक्क तिसऱ्या पंचांनाच बदलावा लागला स्वत:चा निर्णय, असं नक्की झालं काय?

सौरव गांगुली व जय शहा आणखी काही काळ पाहणार बीसीसीआयचा कारभार, हे आहे कारण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---