भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने सिडनीमध्ये सराव करत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओवर मुंबईचा स्टार फलंदाज सुर्यकुमार यादवने कमेंट केली आहे. त्यामुळे सध्या त्याची कमेंट चर्चेत आहे. चाहत्यांनीही यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
नक्की का होत आहे चर्चा –
मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या हंगामात उत्कृष्ट फलंदाजी केली होती. त्याने या हंगामात एकामागून एक मोठे डाव खेळले. मात्र, त्याची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताच्या कोणत्याही संघात निवड झाली नव्हती. यानंतर लगेचच मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा सामना झाला होता. यादरम्यान विराट कोहली आणि सूर्यकुमारमध्ये खुन्नस पाहायला मिळाली होती.
तसेच काही दिवसांआधी विराट कोहलीला ट्रोल करणाऱ्या एका वादग्रस्त मीमला सूर्यकुमार यादवने लाईक केले होते.त्यामुळे तो चर्चेचा विषय बनला होता. विराट कोहलीला ‘पेपर कॅप्टन’ म्हणणाऱ्या एका मीमला सूर्यकुमार यादवने लाईक केले होते. यानंतर सोशल मीडियावरुन त्याच्यावर जोरदार टीका झाली. मात्र, त्यानंतर त्याने या ट्विटला अनलाईक केले होते.
आता चक्क विराटच्या व्हिडिओवर केली कमेंट –
या घटनांनंतर मात्र आता सुर्यकुमारने विराटच्या एका व्हिडिओवर कमेंट केली आहे. विराट कोहली सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौर्यावर असून क्वारंटाईन कालावधीत मैदानावर जोरदार घाम गाळत आहे. अलीकडेच विराट कोहलीने मैदानावर फलंदाजी करतानाचा एक व्हिडिओ अधिकृत ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. विराटने व्हिडीओ शेयर करताना लिहिले की, “कसोटी सामन्याचा सराव करायला आवडते.”
या व्हिडिओवर सूर्यकुमार यादवने कमेंट केली की “ऊर्जा…आवाज…तू वरचढ ठरताना पाहण्यासाठी उत्सुक आहे.”
Energy 🔥 Sound 🔥 can’t wait to watch Domination 🔥#theBrand
— Surya Kumar Yadav (@surya_14kumar) November 17, 2020
सूर्यकुमार यादवने केलेली ही कमेंट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि चाहत्यानी पुन्हा एकदा त्याच्यावर निशाणा साधला आहे.
https://twitter.com/asaltarumugams/status/1328695181785198592
https://twitter.com/pranavkinger/status/1328678346004185088?s=19
https://twitter.com/Newton_Babai/status/1328918624883539968
This is for all those virat fans who went to his( #Suryakumaryadhav ) instagram account & Started sledging him & his Family after that match 🤐🤫He was always within the limits . Everybody can show frustration,attitude & desire to get something accept it or else keep barking 😅 https://t.co/orDWol1Kzk
— Akash patel (@Akashpatel233) November 17, 2020
https://twitter.com/Raghul64190556/status/1328682176859107336
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिका 27 नोव्हेंबरपासून सुरू होईल. दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका, तीन सामन्यांची टी20 मालिका आणि चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली जातील.
वनडे सामन्यांसह या दौऱ्याची सुरुवात होईल. यानंतर टी20 मालिका खेळली जाईल. मर्यादित षटकांच्या मालिकेनंतर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी म्हणजेच चार कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाईल. कसोटी मालिका 17 डिसेंबरपासून सुरु होईल.
महत्त्वाच्या बातम्या –
संकटच असे ओढवले की ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंचे चार्टर्ड विमानाने केले स्थानांतर
आयपीएलपुढे पाकिस्तान सुपर लीगमधील बक्षिसाची रक्कम म्हणजे… अतिसामान्य !!
कराची किंग्स पाकिस्तान सुपर लीगचा विजेता; आयपीएल पाठोपाठ ‘या’ खेळाडूला ७ दिवसात दुसरे विजेतेपद
ट्रेंडिंग लेख –
अन् बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी क्रिकेट स्टेडियममध्ये साप सोडण्याचा केला होता प्लॅन
आठवणीतील १९८७ विश्वचषक : मार्टिन क्रो यांच्या ‘त्या’ झेलाने सामन्याचा नूर पालटला