---Advertisement---

ऐतिहासिक विजयानंतर अफगाणिस्तानच्या विदेशी मंत्र्याने राशिद खानला फोन करुन दिल्या शुभेच्छा..!

On: मंगळवार, जून 25, 2024 6:02 PM
Rashid Khan
---Advertisement---

यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकाच्या (ICC T20 World Cup) सुपर 8 सामन्यात मंगळवारी (25 जून) रोजी किंग्सटाउन येथे पावसानं खोळंबा घातला आणि अफगाणिस्ताननं बांगलादेशचा 8 धावांनी धुव्वा उडवला. या ऐतिहासिक विजयासह अफगाणिस्तान संघानं सेमीफायनलमध्ये धडक मारली. टी20 विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच अफगाणिस्तान सेमीफायनलमध्ये पोहोचला. गुरुवारी (27 जून) रोजी सेमीफायनल-1 साठी अफगाणिस्तान दक्षिण आफ्रिकेशी भिडणार आहे.

अफगाणिस्तानच्या या विजयानं चॅम्पियन संघ ऑस्ट्रेलिया या विश्वचषकातून बाहेर पडला. गेली 3 वर्षे ऑस्ट्रेलियानं अफगाणिस्तानशी सिरीज खेळण्यासाठी नकार दिला होता आणि या टी20 विश्वचषकात अफगाणिस्ताननं ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदाच पराभूत केलं. परंतू बांगलादेशनंतरच्या ऐतिहासिक विजयानंतर अफगाणिस्तानच्या तालिबान शासन परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्ताकी यांनी फोन करुन कर्णधार राशिद खानला (Rashid Khan) शुभेच्छा दिल्या.

 

अफगाणिस्तानच्या या ऐतिहासिक विजयानंतर अफगाणिस्तानमध्ये खूप आनंदाचे वातावरण तयार झालं आहे. तेथील लोक रस्त्यावर फटाके फोडत आहेत तर अफगाणिस्तानमधील खोस्त प्रांतातील रस्त्यावर विजयाचा जल्लोष करण्यासाठी खूप गर्दी जमली होती. तालिबानमध्ये देखील या विजयानंतर जल्लोषासाठी भयानक गर्दी जमली होती.

परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्ताकीनं राशिद खानला या विजयानंतर फोन करुन खूप शुभेच्छा दिल्या. तर क्रिकेटच्या इतर फाॅरमॅटमध्ये सहभागी होण्यासाठी देखील त्यांनी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर कर्णधार राशिद खान (Rashid Khan) म्हणाला की, ”मला वाटतं की सेमीफायनल सामना अफगाणिस्तानमधील मायदेशी परतलेल्या तरुणांसाठी मोठी प्रेरणा ठरेल. अफगाणिस्तानचा संघ सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. आम्ही अंडर-19 स्तरावर अशी कामगिरी केली आहे. परंतु या स्तरावर नाही. आम्ही सुपर 8 सामने देखील आम्ही पहिल्यांदाच खेळलो.”

महत्त्वाच्या बातम्या-

जखमेवर मीठ..! अफगाणिस्तानच्या खेळाडूने पोस्ट करुन ऑस्ट्रेलियाची उडवली खिल्ली!
सेमीफायनलमध्ये धडक मारल्यानंतर अफगाणिस्तानच्या रस्त्यांवर चाहत्यांनी केला जल्लोष!
“बंबईसे आया मेरा दोस्त…” राशिद खानची रोहित शर्मासाठी खास पोस्ट!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---