भारतीय संघाने झिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत शनिवारी (२० ऑगस्ट) विजयी आघाडी घेतली. पहिल्या सामन्यापाठोपाठ दुसऱ्या सामन्यात देखील भारताने विजय मिळवला. भारताचा महत्वाचा फलंदाज केएल राहुल याने या मालिकेतून संघात पुनरागमन केले आहे, पण तो काही खास प्रदर्शन करू शकला नाही. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात स्वस्तात बाद झाल्यानंतर राहुलने स्वत:ची भूमिका स्पष्ट केली.
केएल राहुल (KL Rahul) याने आयपीएल २०२२ हंगामानंतर गंभीर दुखापतीचा सामना केला. त्याने यादरम्यानच्या काळात एकही सामना खेळला नाही. आयपीएलनंतर झिम्बाब्वेविरुद्ध तो पहिल्यांचा मैदानात उतरला आहे आणि भारतीय संघाचे नेतृत्वही करत आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने एकही विकेट न गमावता विजय मिळवल्यामुळे राहुलला फलंदाजीची संधी मिळाली नव्हती. दुसऱ्या सामन्यात तो शिखर धवन (३३) सोबत डावाची सुरुवात करण्यासाठी आला, पण फक्त १ धावा करून बाद झाला. दरम्यान, राहुल जेव्हा फलंदाजीसाठी आला तो दबावात दिसत होता.
सामना संपल्यानंतर राहुल म्हणाला की, “लक्ष्याचा पाठलाग करताना जास्त घाबरलो नव्हतो, मला चांगली खेळी करण्यासाठी वेळ हवा आहे. हे स्पष्ट आहे की, ही मालिका खेळणे आणि काही धावा करणे, ही गोष्ट माझा आत्मविश्वास वाठवण्यात महत्वाची ठरेल. दुर्दैवाने आज हे होऊ शकले नाही. त्यांच्याकडे काही गुणवंत गोलंदाज आहे, जे बांगालदेशविरुद्धच्या मागच्या मालिकेतही मी पाहिले होते. आमच्यासाठी हे एक चांगले आव्हान आहे. आम्ही याठिकाणी चांगले क्रिकेट खेळण्यासाठी आणि जिंकण्यासाठी आलो आहोत.”
दरम्यान, उभय संघातील या दुसऱ्या सामन्याचा विचार केला, तर भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना ३८.१ षटकात १६१ धावा करून सर्वबाद झाला. प्रत्युत्तार भारताने हे लक्ष्य २५.४ षटकात आणि ५ विकेट्सच्या नुकसानावर गाठले. यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनने ३९ चेंडूत सर्वाधिक ४३ धावांची खेळी केली आणि यासाठी त्याला सामनावीर देखील निवडले गेले. ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा सॅमसन भारताचे प्रतिनिधित्व करताना सामनावीर ठरला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘आम्ही चुकलो…’, वनडे मालिका गमावल्यानंतर झिम्बाब्वेच्या कर्णधाराने दिली प्रांजळ कबूली
शुबमन गिलची लॉटरी! न्यूझीलंडविरुद्ध भूषवणार भारताचे नेतृत्त्वपद, विराटचा जोडीदारही खेळणार?
आफ्रिदीपासून सुटका, पण ‘हा’ खेळाडू ठरणार भारताची डोकेदुखी! आयपीएल विजेत्या हार्दिकसोबत आहे खास कनेक्शन






