सध्या चालू असलेल्या हाँग काँग ओपन सुपर सिरीजमध्ये भारतीय बॅडमिंटनपटू प्रणॉयने विजयी सुरुवात केली आहे. प्रणॉयने पुरुष पहिल्या फेरीत हाँग काँगच्या यूं हूचा पराभव करत वाटचाल सुरु केली.
जागतिक क्रमवारीत १० स्थानी असलेल्या प्रणॉयने जरी हा विजय मिळवला असला २४ स्थानी असलेल्या यूंहू याने या फेरीत प्रणॉयला जोरदार लढत दिली.
१ तास सुरु असलेल्या या सामन्यात पहिल्या सेटमध्ये यूंहूने जोरदार लढत देऊन २१-१९ अशा फरकाने हा सेट जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये प्रणॉयने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ सुरु ठेवत यूंहूला या सेटमध्ये २१-१७ अश्या फरकाने हरवले. तर तिसऱ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी हा सामना जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. हा सेट प्रणॉयने २१-१५ असा जिंकत सामनाही जिंकला.
प्रणॉयचा पुढील सामना जागतिक क्रमांकावरील २५ स्थानी असलेल्या जपानचा काझूमासा सकाई या खेळाडूबरोबर होणार आहे.
.@PRANNOYHSPRI wins a 60-minute thriller!
After being one game down, he makes a comeback in the next two games and seals a place into the pre-quarters of #HongKongSS by beating Hong Kong's Hu Yun 19-21, 21-17, 21-15. 👊
— Premier Badminton League (@PBLIndiaLive) November 22, 2017