भारतीय संघाचा नवोदित यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत सध्या चर्चेत आहे. बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला हिला ताई म्हणत तिच्याबद्दल भाष्य केल्यामुळे तो चर्चेत आला होता. आता उर्वशीनेही पंतला भैया म्हणत त्याला जबरदस्त प्रत्युत्तर दिले आहे. यामुळे क्रिकेट आणि मनोरंजन क्षेत्राला फॉलो करणाऱ्या चाहत्यांमध्ये त्यांची जोरदार चर्चा रंगली आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का, पंतने एकदा याच उर्वशीला आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून ब्लॉक केले होते.
काही महिन्यांपूर्वी भारतीय संघाचा हा स्टार खेळाडू प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाला डेट करत असल्याच्या बातम्यांना उधाण आले होते. यानंतर रिषभ आणि उर्वशीला डीनरला जाताना देखील पाहिले गेले होते. परंतु काही दिवसांनंतर रिषभ आणि उर्वशी यांच्यात ब्रेकअप झाल्याने रिषभने उर्वशीला व्हॉटसअप वरून ब्लॉक केले असल्याची चर्चा सर्वत्र रंगली होती. यांचे काही मीम्स देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.
असे म्हटले जाते की, श्रीलंका संघाविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेत रिषभ पंतला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. त्यांनतर त्याला शेवटच्या टी-२० सामन्यातून संघाबाहेर करण्यात आले होते. याच तणावामुळे त्याने उर्वशी रौतेलाला व्हॉट्सअप वरून ब्लॉक केले होते.
Urvashi Rautela, The First Asian Indian to feature in Top 10 World's Sexiest Super Model 2021.
*Le Rishabh Pant pic.twitter.com/3G3PfsD0aa
— Aakash (@theskyrajpoot) February 5, 2021
Rishabh Pant ki id kholo or Urvashi Rautela ko unblock kardo😂 pic.twitter.com/QzV3C0Qr3a
— _karan_363 (@MemeswalaStd) February 4, 2021
#RishabhPant #UrvashiRautela
Rishabh pant after seeing news that urvashi rautela the first Asian Indian to featured in top world's sexiest super model 2021.
Rishabh pant : pic.twitter.com/0C1xxPUJZP— Shubhu007 (@Shu_bhu007) January 30, 2021
परंतु पंत बऱ्याच दिवसांपासून इशा नेगीसोबत रीलेशनशीपमध्ये आहे. इशा ही सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असते. तसेच डेहराडूनला राहणारी इशा ही इंटीरियर डिझायनर आहे. रिषभ पंत तिच्यासोबतचे फोटोज् आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत असतो. गतवर्षी रिषभने, इशासोबत एक फोटो शेअर करत सर्वांना तिची ओळख करून दिली होती. त्याने कॅप्शनमध्ये, “मला फक्त तुला आनंदी करायचे आहे. कारण माझे आनंदी होण्याचा सबब तू आहेस.” असे लिहिले होते.
https://www.instagram.com/p/Bss2wWUBxpq/?utm_source=ig_web_button_share_sheet
https://www.instagram.com/p/B60_hRaHdry/?utm_source=ig_web_button_share_sheet
दरम्यान उर्वशी (Urvashi Rautela) हिने काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत जे वक्तव्य केले, त्यातून असे समोर आले होते की, पंत तिला भेटण्यासाठी दिल्लीला आला होता. पण तिला वेळ नसल्यामुळे पंतसोबत तिची भेट झाली नाही. याप्रकरणी पंतने इंस्टाग्राम स्टोरीद्वारे उर्वशीचे कान टोचले होते.
पंतने स्टोरीमध्ये लिहिले होते की, “किती मजेशीर बाब आहे की, काही लोक लोकप्रियतेसाठी मुलाखतीत खोटे बोलतात, जेणेकरून हे हेडलाईमध्ये येतील. हे खूप वाईट आहे की, हे लोक प्रसिद्धीसाठी किती भुकेले आहेत. देव त्यांना सुखी ठेवो. माझा पिछा सोड ताई! खोटं बोलण्यालाही सीमा असतात.” असे सांगितले जात आहे की, पंतने ही स्टोरी सात मिनिटांनंतर डिलिट केली होती.
त्याच्या या प्रतिक्रियेवर उत्तर देताना उर्वशीने त्याला छोटू भैया म्हटले. तिने ट्वीट करत लिहिले की, “छोटू भैयाने बॅट-बॉल खेळायला पाहिजे. मी कोणी मुन्नी नाही, जी तुझ्यासारख्या तरुण बालकासाठी बदनाम होईल.”
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
वाद चिघळला! पंतच्या कमेंटवर उर्वशी रौतेलाचे प्रत्युत्तर; म्हणाली, ‘छोटू भैया, मी बदनाम व्हायला..’
आफ्रिदीच्या दुखापतीमुळे पाकिस्तान चिंतेत, आशिया चषकापूर्वी होईल का बरा? कर्णधार म्हणतोय..
मांजरेकरांनी पुन्हा काढली जडेजाची खोड; म्हणाले, “त्याला स्वतःलाच…”