इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना ओव्हलच्या मैदानावर पार पडला. हा सामना भारताने १५७ धावांनी जिंकला. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघासमोर विजयासाठी ३६८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. पण इंग्लंडला २१० धावांपर्यंतच मजल मारता आली.
भारतीय फलंदाजांनी दुसऱ्या डावात उत्कृष्ट प्रदर्शन करत इंग्लंड समोर ३६८ धावांचे आव्हान ठेवले होते. ज्याच्या उत्तरादाखल इंग्लंडने चांगली सुरुवात केली होती. मात्र नंतर भारतीय गोलंदाज इंग्लिश फलंदाजांवर वरचढ ठरले. यादरम्यान आपल्या फलंदाजीचे उत्कृष्ट प्रदर्शन करत भारतीय संघाला मजबूत स्थितीत आणणाऱ्या शार्दुल ठाकूरने जो रूटची महत्त्वपूर्ण विकेट घेतली.
रूटने आतापर्यंत झालेल्या तिन्ही कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांना चांगलेच दमवले होते. मात्र चौथ्या कसोटी सामन्यात रूटचा पत्ता चालला नाही. पहिल्या डावातही तो स्वस्तात बाद झाला. त्यानंतर दुसऱ्या डावात इंग्लंडची स्थिती १८२ वर ६ विकेट्स अशी असताना. ८० व्या षटकात शार्दुल ठाकुर गोलंदाजीसाठी आला. तेव्हा त्याने ३६ धावांवर खेळत असलेल्या रूटला बाद केले. शार्दुलच्या गोलंदाजीवर चेंडू रूटच्या बॅटची कड घेत सरळ यष्टींवर आदळला आणि रूट बाद झाला.
The LORD striketh gold! 💥
Shardul bowls one in the corridor outside off and Root chops it on! 🇮🇳Tune into Sony Six (ENG), Sony Ten 3 (HIN), Sony Ten 4 (TAM, TEL) & SonyLIV (https://t.co/AwcwLCPFGm ) now! 📺#ENGvINDOnlyOnSonyTen #BackOurBoys #Shardul #Root pic.twitter.com/m4PoFlEhWI
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) September 6, 2021
त्यामुळे आतापर्यंत भारतीय गोलंदाजांवर वरचढ ठरलेल्या रूटला या सामन्यात मात्र चमक दाखवता आली नाही. दरम्यान, दुसऱ्या डावात भारतीय संघाने ४६६ धावा केल्या होत्या. ज्यामुळे इंग्लंडला ३६८ धावांचे आव्हान मिळाले. याच्या उत्तरादाखल इंग्लंडची चांगली सुरुवात झाली होती. मात्र, ५ व्या दिवशी भारतीय गोलंदाज इंग्लिश फलंदाजांवर वरचढ ठरले.
इंग्लंडकडून दुसऱ्या डावात हसीब हमीदने सर्वाधिक ६३ धावा केल्या, तर रॉरी बर्न्सने ५० धावा केल्या. याशिवाय कर्णधार जो रुटने ३६ धावांची खेळी केली. मात्र, अन्य कोणालाही भारतीय गोलंदाजांसमोर टिकाव धरता आला नाही. भारताकडून उमेश यादवने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूरने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
महत्वाच्या बातम्या –
–व्वा बेटे, मौज कर दी! एरवी सर्वांना ट्रोल करणारा जाफर, कॉट्रेलच्या ‘हिंदी’ उत्तराने झाला गार
–बुमराह ऑन फायर!! ऑली पोपला बोल्ड करत घडवला मोठा इतिहास; कपिल देव, शमी सारखे गोलंदाज पडले मागे
–पहिल्याच वर्षी ‘हा’ मुंबईकर बनला अमेरिकेच्या राष्ट्रीय संघाचा कर्णधार, पाहा इतर शिलेदारांचीही नावे