भारतीय हाॅकी संघ सुवर्ण पदकाच्या आशेत पॅरिस ऑलिम्पिक2024 मध्ये गेला होता. परंतु संघ कांस्य पदक जिंकण्यात यशस्वी राहिला. ज्यामुळे संपुर्ण देशात आनंदाचे वातावरण बहारले. आता भारतीय संघ कांस्यपदकासह मायदेशी परतला आहे. दुल्ली विमानतळावर हाॅकी संघाचे ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत देखील करण्यात आले होते. आता भारतीय हाॅकी संघातील खेळाडू अमृतसर येथील सुवर्ण मंदीरला दर्शन घेण्यासाठी पोहचले आहेत. जेथे त्यांच्यावर पुष्पवृष्टी करुन स्वागत करम्यात आले.
अमृतसरला पोहोचल्यावर भारतीय हॉकी संघाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. रविवारी (11 ऑगस्ट) सकाळी भारतीय हॉकी संघाचे खेळाडू अमृतसर विमानतळावर पोहोचले तेव्हा तेथील दृश्य खूपच खास होते. पंजाबचे कॅबिनेट मंत्री कुलदीप सिंग पालीवाल, हरभजन सिंग ईटीओ आणि खासदार गुरजित सिंग यांच्यासह अनेक मान्यवर खेळाडूंचे स्वागत करण्यासाठी उपस्थित होते. खेळाडूंच्या कुटुंबांव्यतिरिक्त शेकडो हॉकीप्रेमीही त्यांच्या आवडत्या खेळाडूंचे स्वागत करण्यासाठी विमानतळावर जमले होते. खेळाडू विमानतळाबाहेर येताच त्यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला आणि सर्वत्र आनंदाची लाट पसरली.
VIDEO | Indian Hockey team members visit the Golden Temple of Amritsar after returning to India from Paris.
Indian Hockey team won bronze medal at the Paris Olympics this year.#ParisOlympics2024
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvqRQz) pic.twitter.com/uxZirwVuLR
— Press Trust of India (@PTI_News) August 11, 2024
आनंद व्यक्त करताना भारतीय हॉकी संघाचा स्टार खेळाडू सुखजित सिंगचे वडील अजित सिंग म्हणाले, “आपल्या संघाने भलेही कांस्यपदक जिंकले असेल, पण ते आपल्यासाठी सुवर्णपदकापेक्षा कमी नाही. जेव्हा माझा मुलगा माझ्याकडे आला आणि जेव्हा तो त्याचे पदक माझ्या गळ्यात घातला, हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे आणि या अद्भुत कामगिरीसाठी मी संपूर्ण संघाचे मनापासून अभिनंदन करतो आणि आता आमच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या आहेत. आपल्या खेळाडूंनी देशाला गौरव मिळवून दिला आहे याचा आम्हाला खूप अभिमान आहे.
हेही वाचा-
आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये कोहली रचणार इतिहास? ‘या’ दिग्गजांना सोडणार मागे
सूर्यकुमार यादवची अमेरिकेतही हवा! लोकप्रिय संघाकडून मिळाली खास भेट
पॅरिस ऑलिम्पिक संपताच भारतीय बॅडमिंटनपटूने उरकला साखरपुडा, फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल